घरफोडीच्या पैशात मौजमस्ती केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 09:38 PM2019-12-02T21:38:18+5:302019-12-02T21:40:08+5:30
जळगाव : नेहमी गावठी व देशी दारु पिणारे महागडी व विदेशी दारुसह मांसाहारी जेवणावर ताव मारायला लागले अन् तेथेच ...
जळगाव : नेहमी गावठी व देशी दारु पिणारे महागडी व विदेशी दारुसह मांसाहारी जेवणावर ताव मारायला लागले अन् तेथेच घरफोडी करणारे दोघं जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ज्ञानेश्वर पंढरी बाविस्कर (३५) व सचिन उर्फ घाऱ्या युवराज बाविस्कर (२७) दोघं रा.शनी पेठ, जळगाव यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना सोमवारी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पुंडलिक सोनवणे (रा.कांचन नगर) हे बाहेरगावी नारायण नागबली पूजेसाठी गेले असता २० सप्टेबर २०१९ रोजी त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये रोख व दागिने असा २ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
घाºयाने दिली टीप
अटक केलेल्यांमधील सचिन उर्फ घाºया हा मोहन सोनवणे यांच्या घरासमोर वास्तव्याला आहे. सोनवणे यांच्याकडे काही तरी व्यवहार झालेला आहे व त्याची रक्कम घरात असून पूर्ण कुटुंब गावाला गेल्याची टीप घाºया याने ज्ञानेश्वर बाविस्कर याला दिली. त्यानुसार दोघांनी त्याच रात्री घरफोडी करुन ही रक्कम लांबविली.ही माहिती दोघांनीच पोलीस तपासात दिली. दरम्यान, ही घरफोडी दोघांनीच केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील व यांच्या पथकाने दोघांना अटक केली.
मौजस्तीच आली अंगाशी
या दोघांनी घरफोडी केल्यानंतर रोख रक्कम वाटून घेत हॉटेलमध्ये उच्च दर्जाची दारु व मांसाहारीवर ताव मारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दोघांकडे दोन हजाराच्या नोटांचे बंडल असल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले होते. तेथेच संशयाची पाल चुकचुकली आणि दोघांना पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल मात्र हस्तगत झालेला नाही. शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात दोघांना देण्यात आले आहे.