सोनसाखळी चोरीची घटना पाहिली अन‌् चोरी सुरु केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:23+5:302021-03-10T04:17:23+5:30

जळगाव : तिघे मित्र शहरात पायी फिरत असताना डोळ्यासमोर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी एका महिलेची सोनसाखळी लांबविली. त्या महिलेने आरडाओरड ...

He saw the theft of gold chain and started stealing | सोनसाखळी चोरीची घटना पाहिली अन‌् चोरी सुरु केली

सोनसाखळी चोरीची घटना पाहिली अन‌् चोरी सुरु केली

Next

जळगाव : तिघे मित्र शहरात पायी फिरत असताना डोळ्यासमोर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी एका महिलेची सोनसाखळी लांबविली. त्या महिलेने आरडाओरड केली, मात्र काहीच उपयोग झाला नाही. चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. काही सेकंदात हजारो रुपयांची सोनसाखळी पचविल्याचे पाहून आम्हीलाही ही बुध्दी सुचली. दुसऱ्या दिवशी अशाच पध्दतीने सोनसाखळी लांबविली. योगायोगाने ही घटना पचली, त्यामुळे दुसऱ्या घटनेत आणखी हिंमत केली व ती देखील घटना पचली..मग आम्ही मागे वळून पाहिले नाही चार महिन्यात शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकलोच..हे बोल आहेत सोनसाखळी लांबविणाऱ्या टोळीतील तिघा मित्रांचे.

पुण्यातून आकाश चौधरी याला ताब्यात घेतल्यानंतर जळगावात अमोल उर्फ रामेश्वर अहिरे व सागर चौधरी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व सहकाऱ्यांनी तिघांची एकत्रित चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यात कसे वळलो याची माहिती दिली. आकाश याचे वडील शहरात हातगाडीवर नारळ विक्री करतात तर आई कपडे इस्त्री करुन कुटुंबाला हातभार लावते. अमोल याचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात सागर हा मेकॅनिकल पदविधारक असून अभियंता आहे. वडील मनपात नोकरीला होते, आता निवृत्त झाल्यानंतर चारचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. सर्वांचे आई, वडील ऊन, थंडी व पावसाची तमा न बाळगता दिवसभर कष्ट करतात अन‌् मुलांनी चोरीचा मार्ग निवडल्याने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे.

बिग बाजारातून लांबविल्या होत्या एलईडी

आकाश सूर्यवंशी हा काही वर्षापूर्वी बिग बाजारात नोकरीला होता. तेथे त्याने दोन लाख रुपये किमतीच्या सात एलईडी टीव्ही चोरी केल्या होत्या. तेव्हा त्याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटकही झालेली होती. दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या बाहेर जावून सोनसाखळी लांबविण्याचे नियोजन केल्यानंतर ट्रॅव्हल्स बसमधून दुचाकी पुण्यात न्यायचे व तेथे दुचाकीचा वापर करायचे. सागर हा दुचाकी चालविण्यात तरबेज असून १४० च्या प्रतीवेगाने तो दुचाकी चालवितो तर आकाश हा चालत्या दुचाकीवरुन सोनसाखळी लांबविण्यात तरबेज आहे.

काही संशयित रडारवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीत तिघांच्या व्यतिरिक्त आणखी काही जण असण्याची शक्यता असून दागिनेही अजून हस्तगत होऊ शकतात. त्याबाबतचे धागेदोरे पोलिसांना मिळालेले आहेत. अटकेतील तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेतील तिघांकडून रामानंद नगर, भुसावळ बाजारपेठ, अमळनेर, चोपडा शहर, रावेर, भुसावळ शहर, मुक्ताईनगर, जळगाव तालुका व चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमधील सोनसाखळी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Web Title: He saw the theft of gold chain and started stealing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.