अमळनेरातून मोटारसायकल चोरून धुळ्यात विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 09:23 PM2020-11-07T21:23:49+5:302020-11-07T21:24:41+5:30
मोटारसायकल चोरून धुळ्यात एजंटला विकणाऱ्या अमळनेरच्या कसाली मोहल्ल्यातील १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे.
अमळनेर : मोटारसायकल चोरून धुळ्यात एजंटला विकणाऱ्या अमळनेरच्या कसाली मोहल्ल्यातील १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे.
सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील यांची मोटारसायकल चोरीस गेली होती. ही मोटारसायकल अमळनेर येथील कसाली मोहल्ल्यातील जाफरखा शरीफखा मेवाती या १९ वर्षीय तरुणाने चोरून धुळे येथील एका एजंटला १५ हजार रुपयात विक्री केली होती. ही माहिती गोपनीय शाखेचे शरद पाटील याना मिळाली. त्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे याना सांगितली. राजेश चव्हाण, दीपक विसावे, भटूसिंग तोमर, संजय पाटील, दीपक माळी, रवी पाटील, भूषण बाविस्कर, हितेश चिंचोरे या पथकाने त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. चोरट्याने घरी भिवंडी जात असल्याचे सांगून लक्झरी बसमध्ये बसून पळ काढला. पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. धुळ्याचे दलालदेखील पकडण्यात येणार आहेत. यामुळे अनेक मोटारसायकली चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीला अटक केली आहे. तपास राजेश चव्हाण करीत आहेत.