ट्रॅक्टरच्या शोरूमला जायचे सांगून गेले अन‌् आत्महत्या केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:19+5:302021-07-07T04:19:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ट्रॅक्टरच्या शोरूमला जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या नंदलाल सुरेश गोसावी (वय ४५, ...

He told her to go to the tractor showroom and committed suicide | ट्रॅक्टरच्या शोरूमला जायचे सांगून गेले अन‌् आत्महत्या केली

ट्रॅक्टरच्या शोरूमला जायचे सांगून गेले अन‌् आत्महत्या केली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ट्रॅक्टरच्या शोरूमला जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या नंदलाल सुरेश गोसावी (वय ४५, रा. दिनकरनगर) यांचा तीन दिवसांनंतर सोमवारी सकाळी खेडी शिवारातील पडक्या विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, नंदलाल गोसावी यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नंदलाल गोसावी हे ट्रॅक्टर चालक होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता आई सुशीलाबाई यांना ट्रॅक्टर शोरूमला जाऊन येतो, असे सांगून घरातून निघाले. मात्र, पुन्हा घरी परतले नाही. कुटुंबीयांना शोध घेतला असता मिळून आले नव्हते. सोमवारी सकाळी शेतमजूर कामावर जात असताना जनार्दन खडके यांच्या विहिरीजवळ दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता पडक्या विहिरीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दुपारी ४ वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत मयत दिनकरनगर येथील बेपत्ता नंदलाल गोसावी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. गोसावी यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, आई सुशीलाबाई व मुले जयेश (वय १५), कृष्णा (वय १३) आणि उमेश (वय-१०) असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत पडल्याने वृद्धेचा मृत्यू

जुने जळगाव भागात राहणाऱ्या मथुराबाई भिवा महाजन (८५) यांचा मेस्कोमातानगरात विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. दरम्यान, मथुराबाई यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी त्याचा इन्कार केला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मथुराबाई महाजन या मुलगा रवींद्र, सूनबाई यांच्यासह राहत होत्या. मुलगा रवींद्र महाजन एमआयडीसीतील कंपनीत कामाला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर दुपारी मेस्कोमातानगरातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

Web Title: He told her to go to the tractor showroom and committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.