मुझे हक है... म्हणत त्याने जपला भावबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 09:34 PM2020-02-09T21:34:39+5:302020-02-09T21:36:58+5:30

अजब आणि अनोख्या प्रेमाच्या या कहाणीला कासोद्यात लग्नाच्या निमित्ताने मूर्त स्वरूप आले त्यावेळी अनेकांच्या डोळ्याच्या कळा अश्रूंनी पाणावल्या.

He told me, "I have a right ..." | मुझे हक है... म्हणत त्याने जपला भावबंध

मुझे हक है... म्हणत त्याने जपला भावबंध

Next
ठळक मुद्देकॅन्सर पीडित गुलनाज सोबत तौसीमचा निकाह कासोद्यातील तरुणाने घालून दिला आदर्श

प्रमोद पाटील 
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : दोन वर्षांपूर्वी झालेली लग्नाची बोलणी अन् त्यानंतर उपवर तरुणीला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची लागण. हाडाच्या कॅन्सरने अकाली आलेल्या अपंगत्वामुळे तरुणीचे भावी आयुष्याचे स्वप्न उद्ध्वस्त होते की काय? अशी भीती व्यक्त होत असताना उपवर मुलाने पुढाकार घेत कॅन्सरपीडित तरुणीसोबत निकाह करीत नात्यातील भावबंध जोपासला. अजब आणि अनोख्या प्रेमाच्या या कहाणीला कासोद्यात लग्नाच्या निमित्ताने मूर्त स्वरूप आले त्यावेळी अनेकांच्या डोळ्याच्या कळा अश्रूंनी पाणावल्या.
अडीच वर्षांपूूर्वी कासोदा येथील ए.टी.टी. हायस्कूलमागील इंदिरा नगर येथील रहिवासी तौसीमखान याचा आपल्या मामाची मुलगी गुलनाज खानसोबत विवाह निश्चित झाला होता. त्यानंतर लग्न फेब्रुवारी २०२० मध्ये होणार होते. तौसीम आणि गुजनाज भावी आयुष्याचे स्वप्न रंगवित असताना २०१९ मध्ये गुलनाजच्या डाव्या बाजूच्या दंडात वेदना सुरु झाल्या. कुटुंबियांनी गावातील दवाखान्यातील उपचारानंतर डॉक्टरांनी मुंबईत रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. याठिकाणी डॉक्टरांनी हाडाच्या कॅन्सरचे निदान केले. जेमतेम परिस्थिती असताना आईवडिलांनी मुलीची शस्त्रक्रिया करीत तिच्या वेदनेवर फुंकर घातली. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या हाडातील दुखणे पूर्णपणे गेले होते. मात्र संकटे पिच्छा सोडण्याचे नाव घेत नव्हते. सहा महिन्यांनंतर गुलनाजच्या पाठीच्या मणक्यात त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी हाडाच्या कॅन्सरचे निदान केल्यानंतर आता हे दुखणे बरं होणे शक्य नाही, असेही सांगितले. अकाली दुख:मुळे नवरी मुलीला दु:खाने काळाच्या ओघात ओढले होते. यासाऱ्यात आजारपणाने तिचे दोन्ही पाय निकामी झाले. दुसºयाच्या मदतीशिवाय ती जागेवरून सरकू शकत नाही. लग्नाची तारीख जवळ आल्याने आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजार असल्याने सर्वच जण विवाहाबाबत साशंक होते. त्यातच उपवर तरुण तौसिफ याने गुलनाज हिच्यासोबत विवाहासाठी ठाम असल्याचे सांगितले. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी मुस्लीम धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे विवाह पार पडला. यावेळी मुलाच्या धैर्याचे व अतुट प्रेमामुळे सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले होते. हे लग्न पहाण्यासाठी हिंदू मुस्लिमांसह लहान, थोर, महिला यांच्यासह सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी गावात याच लग्नाची सर्वत्र चर्चा होत होती. दि.१४ चा खºया प्रेमाचा व्हॅलेंटाईन 'डे' आज येथे सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने साजरा झाला.

गुलनाजला लग्नानंतर कॅन्सर झाला असता तर सोडले नसते. तर आता का म्हणून तिला अंतर देऊ. आमचे लग्न जुळले होते. एकमेकांसोबत विवाह व्हावा ही आमच्या दोघांची इच्छा होती. त्यानुसार आम्ही विवाह केला.
: नवरदेव तौसीम खान, कासोदा.

Web Title: He told me, "I have a right ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.