‘नाते सांभाळले, अन् त्याच्या अंगाशी आले..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:22 PM2017-12-19T16:22:50+5:302017-12-19T16:25:11+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘कायद्यातील गमती-जमती’ या सदरात अॅड. माधव भोकरीकर यांचा विशेष लेख.

'He took care of himself, and came with his body ..' | ‘नाते सांभाळले, अन् त्याच्या अंगाशी आले..’

‘नाते सांभाळले, अन् त्याच्या अंगाशी आले..’

googlenewsNext

घटना 1961 सालातील. शेतक:याच्या गजबजलेल्या घरातील. चारपाच भावंडातील मोठा भाऊ देवाला प्रिय झाला. एकत्र कुटुंबाची जबाबदारी हिंदूसंस्कृतीप्रमाणे नंतरच्या भावाकडे आली. मोठय़ा भावाचा एकच मुलगा. आई अगोदरच सोडून गेली होती. आईबापाविना पोरगा सांभाळला काकाने, काकूने. त्यांना एकच मुलगी. काकाने कर्तव्यात कधी कसूर केली नाही. भाऊबहिणीच्या नात्यात कधी चुलतपणा डोकावला नाही. नातं सख्खच राहिलं. मुलाचे लग्न झाले. सुनबाईची पावलं लक्ष्मीची पावलं बनून आली. काकाला जबाबदारीतून मोकळे झाल्यासारखे वाटले. इतर भावांना मिळकतीतील हिस्से दिलेले होतेच. आईबापाविना पोराला सांभाळता काका त्याच्यातच केव्हा राहू लागले, समजले नाही. मुलीचे लग्न झाले. सासरी गेली. लग्नात भावाने कसली उणीव पडू दिली नाही. यापूर्वीच काकाने त्याच्या हिश्श्यातील जमिनी, घरे विकली; थोडी जमीन, एकदोन घरे होती. पुतण्याचाही हिस्सा याच्याजवळच होता. काका-पुतणे वेगळे नातेच नव्हते. काका कर्तेपणाच्या जबाबदारीतून मुक्त झाला. जबाबदारी पुतण्याने सांभाळली. काकाला वेगळे राहण्याची आवश्यकताच नव्हती, विचारही नव्हता. पुतण्या, काकाला बाप म्हणूनच सांभाळू लागला. मुलगीपण अधूनमधून बापाला भेट घ्यायला यायची. जावईबापूंच्या पाहुणचारासहीत पुतण्या, त्याची प}ी बघायची. काकाला समाधान वाटायचे. आपल्या पश्चात मुलीची काळजी नाही. मनाशीच खूश व्हायचा, देवाचे आभार मानायचा. ‘माङयानंतर तुङोच आहे सगळे. माझा भरवसा नाही. कुठे नाव लावण्यासाठी तलाठय़ाकडे अर्ज द्यायचे असतील तर दे’. म्हातारा समाधानाने म्हणायचा. पुतण्या समजूत काढायचा. अर्जफाटे झालेच नाही, कोणतीही वाट न पहाता देवाने काकाला बोलावून घेतले. सन 1992 दरम्यानची गोष्ट. पुतण्याने काकाचे अंत्यसंस्कार केले. पितृऋण फेडले. मुलीला बापाचे समजले. आली, चार दिवस राहिली. बापाचे जाण्याने झालेले दु:ख हलके केले. निघून गेली. वर्ष-दीड वर्ष झाले. एके दिवशी भावाला बहिणीची तालुका कोर्टामार्फत नोटीस आली. बहिणीने दावा केला. वर्ष 1993. बापाची मिळकत मिळावी, एकमेव वारस म्हणून. लहानपणापासून सख्खे-चुलत माहीत नसलेली भावंडं, मिळकतीसाठी कोर्टात होते. कायदा बहिणीच्या बाजूने असेल पण समाजाचा पाठिंबा भावाच्या बाजूने होता. भावाने लहानपणापासून काकाने स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळले. आपणही काकासोबत वडिलांप्रमाणेच व्यवहार केला. बहिणीच्या लग्नात कायकाय केले. काका कित्येक वेळा ‘शेतीबाडी, घरे नावावर करून घे,’ हे सांगत असतानादेखील केले नाही. मनात पाप नव्हते. त्याचा, त्याच्या वडिलांचा हिस्सापण काकाजवळच होता सांगितले. दोन्ही बाजूने भरपूर कागदपत्रे रंगली. हिंदूवारसा कायद्याप्रमाणे मुलीला वडिलांच्या मिळकतीत हक्क मिळाला. सन 2005 मध्ये दाव्याचा निकाल बहिणीच्या बाजूने लागला. भावाला वाईट वाटले. बहिणीच्याकडील मंडळी खूश होती. भावाने तालुका न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयांत दाद मागितली. जिल्हा न्यायालयाने तालुका न्यायालयाचाच निकाल 2011 मध्ये कायम केला. भावाला वाईट वाटले. संतापही आला. ‘काकाचे केले ते मिळकत मिळण्यासाठी नाही’ त्यावेळी बहीण काय करत होती. फक्त मिळकत हवी, जबाबदा:या नकोत.’ मनात भाऊ पुटपुटू लागला. (पूर्वार्ध)

Web Title: 'He took care of himself, and came with his body ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.