जन्मा आलो त्याचे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:03 PM2019-05-07T12:03:57+5:302019-05-07T12:08:12+5:30
एखाद्याला अमृताच्या कुंडात टाकल्यानंतर त्याने तोंड गच्च दाबून धरले तर काय उपयोग.
जन्म आणि मरण या दोन आवश्यक प्रक्रिया आहेत. पुनरपि जननं पुनरपि मरणं या न्यायाने ते बंधन आहे. परंतु जन्माला आल्यानंतर संत कृपेशिवाय जन्माचे सार्थक होत नाही संतकृपा ही आवश्यक आहे व सफल आहे. एखाद्याला अमृताच्या कुंडात टाकल्यानंतर त्याने तोंड गच्च दाबून धरले तर काय उपयोग.
अमृताच्या सागरी बुडीजे !आणि तोंडा का वज्रमिठी पाडिजे! त्यास अमृत काय करणार तसा संतांचा अनुभव. संतांनी जगासाठी अमृताचा कुंभ मोकळा करून ठेवला आहे. उदाहरणार्थ तेजाचे भांडार देवाने सूयार्ला दिले. परी महेशे सूर्या हाती ! दिधली तेजाची सुती !तया भासा अंतर्वर्ती ! जगची केले ! अर्थात सूयार्ने ते जगाला दिले तसा संतांचा अनुभव संत गुप्त ठेवीत नाही सेवितो हा रस वाटीतो आणिका !तो ते अनुभव जगाला देतात आणि जगाला त्याची गरज आहे जगाला तो अनुभव घेता येतो घेणाऱ्याला त्याची गरज वाटली पाहिजे व घेता आला पाहिजे देणाºयाने ही दिले पाहिजे जे जे संसारात गरज आहे आहे ते मिळत नाही व मिळते त्याची गरज नाही पण संतांचे अनुभवाची सर्वांना गरज आहे कारण तो सफल आहे देवाचे वर्णन केले तर देवाला बरे वाटेल का संतांचे वर्णन केले तर देवापुढे आल्यावर देवाची आवड काय आहे, हे पहावे लागते देवाला काय आवडते हे देवच बोलतो देवाला संत प्रियआहेत परंतु देव व संत वेगळे नाहीत देव ते संत !संत ते देव !निमित्त त्या प्रतिमा ! सारांश संता पासून व्यक्तीला जो अनुभव येतो तो हाच की जन्माला आलो त्याचे आजि फळं झाले साचें! तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती! मी जन्माला आलो त्याचे आज फळ झाले व ते आज साच झाले यात फळ व साच हे दोन शब्द महत्त्वाचे आहे पुढील संसाराचा जो अनर्थ आहे त्याचा पाया म्हणजे जन्म आहे हे सगळे दु:ख जन्माला आलो म्हणून संसार म्हणजे जन्म
मृत्यू संसार सागरात!
मृत्यू हा जन्माचा उपलक्षण आहे, ही एक बाजू झाली व दुसºया बाजूला जन्माबद्दल आनंद मानला जातो. बरे झाले आलो या जन्मासी! जोड जोडली मनुष्यदेह ऐसी! धन्य आम्ही जन्मा आलो !दास विठोबाचे झालो ! अनिष्ट निवृत्ती व इष्ट प्राप्तीचे साधन जन्म आहे हे जन्माला आलो नसतो तर पंढरीची वारी पांडुरंगाचे दर्शन संत संगती हा सोहळा पहायाला मिळाला नसता. एकच वस्तू जन्म ती अनुकूल प्रतिकूल भावनेचा विषय होऊ शकत नाही उदाहरणार्थ एका माणसाने माझ्या हातावर काळा खडा दिला मी त्यावर मुर्खा म्हणून रागावलो व तो खडा फेकून दिला. नंतर तो म्हणाला महाराज या मातीच्या खड्याच्या भाव पाचशे रुपये तोळा आहे ही कस्तुरी आहे दिसायला काळी माती ती पण गुण केवढा. कस्तुरीचे रूप अति हिन वर! रूप हिन कस्तुरी पण सुगंध किती? कस्तुरी ही शरीरातील उष्णता नष्ट झाली तर ती निर्माण करते हे ऐकल्याबरोबर मी तो खडा शोधु लागलो फेकून देणाराही मीच व परत शोधून काढणारही मीच वस्तू एकच होती याचे कारण कस्तुरी ही स्वरूपाने प्रतिकूल पण गुणाने अनुकूल तसा देहा स्वरूपाने प्रतिकूल. म्हणून जन्मा आलो त्याचे अजि फळ झाले साचें! सूयार्चा उदय आज झाला पण आजच झाला असे नाही त्याप्रमाणे जन्माचा व जिवाचा संबंध सूर्योदय व सूर्यास्तासारखा आहे. जन्माला अनेक वेळा आलो तसा आजही आलो पण संत कृपेमुळे फळ आज झाले बहुत दिवस होती मज आस! आजी घडले सायास रे ! मागे अनेक वेळा जन्माला आलो पण फळ झाले नाही ते फळ संत कृपेमुळे आज मिळाले. एक कोय असते त्याला खांबे येतात तसे संसारात मिळेपर्यंत बायको साध्य राहते पुढे ती साधन होते सत्य फळ काय हे कळत नाही तुम्ही संसाराला फळ समजत असाल.., साध्य समजत असाल पण ते खरे नाही संसार हा रमणीय आहे साधन म्हणून त्याचा उपयोग करायचा आहे ते हे फळ ही नाही व साचं फलही नाही तर सात फळ म्हणजे तुम्ही सांभाळले संती भय निरसळे खंती! असेच होय.
- भाऊराव महाराज, मुक्ताईनगर