जळगाव शहरातील कासमवाडीत आढळले बालकाचे धडावेगळे शीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 09:24 PM2017-11-30T21:24:34+5:302017-11-30T21:28:05+5:30
कासमवाडीत कब्रस्तानला लागून असलेल्या नाल्याकाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता एक ते दीड वर्षाच्या बालकाचे शरीरापासून वेगळे झालेले शीर आढळून आले. पंधरा दिवसापूर्वीही तुकारामवाडी परिसरात असेच शीर आढळून आले होते, त्यामुळे नेमका प्रकार काय आहे? याबाबत रहिवाशी व पोलीसही अचंबित झाले आहेत.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, ३० : कासमवाडीत कब्रस्तानला लागून असलेल्या नाल्याकाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता एक ते दीड वर्षाच्या बालकाचे शरीरापासून वेगळे झालेले शीर आढळून आले. पंधरा दिवसापूर्वीही तुकारामवाडी परिसरात असेच शीर आढळून आले होते, त्यामुळे नेमका प्रकार काय आहे? याबाबत रहिवाशी व पोलीसही अचंबित झाले आहेत.
कासमवाडीत नाल्याकाठी राहणारे बाळू भारंबे व प्रदीप भारंबे यांच्या घरासमोर अंगणात हे शीर आढळून आले. कुत्र्याने हे शीर आणून येथे सोडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या शुभम घुरे या मुलाने दिली. तीन ते चार दिवसापूर्वीच या बालकाचा मृत्यू झाला असावा. हे शीर मुलाचे आहे की, मुलीचे हे समजू शकले नाही. दरम्यान, या प्रकाराची चर्चा झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारपर्यंत हे शीर जागेवरच पडून होते.
उलटसुलट चर्चा
या शीरबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले असावे किंवा आजारपणामुळे मृत्यू होऊन मृतदेह कुजलेला असावा आणि तो कुत्र्यांनी उकरुन काढला असण्याची शक्यता आहे. कब्रस्तानमधील कर्मचाºयांनीही पुरलेल्या मृतदेहांचा खात्री केली असता हे बाळ तेथील नसल्याचे स्पष्ट झाले.