पारोळ्यात नोटीस बजावल्याने मुख्याधिका:यांना शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:45 PM2017-09-14T18:45:50+5:302017-09-14T18:49:55+5:30
नगरपालिकेच्या सफाई कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल
ऑनलाईन लोकमत
पारोळा, दि. 14 - येथील सफाई कामगारास कामावर गैरहजर राहिल्याबाबत नोटीस बजावली, याचा राग आल्याने कर्मचा:याने मुख्याधिका:यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराला घडली. याप्रकरणी चेतन रमेश शिंदे या कर्मचा:याविरुद्व पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी सचिन भगवान माने यांनी गेल्या महिन्यात झालेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रत्यक्ष पहाणीस गेले होती. .जागेवर गैरहजर असलेल्या कर्मचा:यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात चेतन रमेश शिंदे (रा.आंबेडकर चौक, पारोळा) या कर्मचा:याचाही समावेश आहे. याचा त्याला राग आल्याने त्याने गुरुवारी सकाळी साडेअकराच्या वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी सचिन माने यांनो पालिकेतील कक्षात शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.