हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी स्वखर्चातून बसविली सौर यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 05:33 PM2017-10-13T17:33:43+5:302017-10-13T17:41:53+5:30
भुसावळातील शाळेत सोलर पॅनल यंत्रणा
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.१३ : शहर व तालुक्यात पहिल्यांदाच हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयात सोलर पॅनल उभारण्यात आले. विशेष म्हणजे मुख्याध्यापिका विद्या मुजुमदार व त्यांचे पती अॅड. मधुसूदन मुजुमदार यांनी स्व:खर्चातून हे पॅनल उभारले आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, द.शि. विद्यालयाचे शिक्षक जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांच्या हस्ते सोलर पॅनलचा शुभारंभ करण्यात आला. दोन किलो वॅटचे हे सोलर पॅनल आहे. सध्या सर्व वर्गांना वीजपुरवठा होईल एवढी त्याची क्षमता आहे. भविष्यात ती वाढवून संगणक लॅबही सोलरवर चालविण्याचा मानस आहे. हजार विद्यार्थ्यांना पुरेल एवढ्या क्षमतेचे वॉटर फिल्टर कुलरचे उद्घाटन रागिणी चव्हाण यांच्या हस्ते प्रसंगी करण्यात आले. संगणक लॅबचे आधुनिकीकरण करून त्याची रंगरंगोटी, ३० संगणक, नवीन सॉफ्टवेअर, प्रोजेक्टर, ई-लर्निंगचे उद्घाटन अहिरे यांच्या हस्ते झाले. माध्यान्ह भोजनाच्या फळभाज्या व इतर साहित्य ठेवण्यासाठी फ्रिज घेण्यात आला. या सर्व सुविधांसाठी विद्या मुजुमदार व अॅड.मधुसूदन मुजुमदार यांनी स्वत: केला आहे. त्यांना उपमुख्याध्यापक मनोज माहेश्वरी, पर्यवेक्षक प्रमोद आठवले, अनिल माळी, मयूर शहा, सतीश कवटे, दीपक आमोदकर, गायकवाड यांचे सहकार्य लाभले. गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञ संजय गायकवाड, यशवंत धायगुडे, जितेंद्र पवार, रमेश दांगोडे उपस्थित होते. सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रमोद आठवले यांनी केले.