विद्यापीठात आरोग्य जागरूकता शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:53+5:302021-01-02T04:13:53+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवारी (दि.१) शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जागरूकता शिबिर घेण्यात आले. संगणकशास्त्र ...

Health awareness camp at the university | विद्यापीठात आरोग्य जागरूकता शिबिर

विद्यापीठात आरोग्य जागरूकता शिबिर

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवारी (दि.१) शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जागरूकता शिबिर घेण्यात आले.

संगणकशास्त्र प्रशाळा आणि सामाजिकशास्त्र प्रशाळेअंतर्गत प्रा. मनीष जोशी आणि डॉ. प्रशांत सोनवणे यांना उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर होणाऱ्या ताण-तणावाच्या परिणामांचे परीक्षण आणि व्यवस्थापन करणे या शिर्षकाखाली दीर्घ संशोधन प्रकल्प मिळाला आहे. त्या प्रकल्पांतर्गत संगणकशात्र व सामाजिकशास्त्र प्रशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जागरूकता शिबिर घेण्यात आले. यामध्ये शारीरिक व मानसिक ताण-तणाव संदर्भात माहिती संकलनासाठी शारीरिक सेन्सर व ऑनलाइन प्रश्नावलीद्वारे तपासणी करून व्यक्तिमत्व प्रकार व तणावाची पातळी काढण्यात आली. या शिबिरास संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर. कोल्हे, प्रकल्प संचालक प्रा. मनीष जोशी व डॉ. प्रशांत सोनवणे उपस्थित होते.

Web Title: Health awareness camp at the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.