राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आरोग्य शिबीर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:15 AM2021-02-08T04:15:02+5:302021-02-08T04:15:02+5:30
जळगाव : राष्ट्रवादी महिला आघाडी व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी `वाण आरोग्याचे ` या उपक्रमाअंतर्गत कांचननगर ...
जळगाव : राष्ट्रवादी महिला आघाडी व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी `वाण आरोग्याचे ` या उपक्रमाअंतर्गत कांचननगर येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. वृषाली पाटील, डॉ. मनोहर पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. एस. आर. पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्यासह मीनाक्षी चव्हाण,शंकुतला धर्माधिकारी, आशा अंभोरे, लता पाटील, चित्रा देवरे, शोभा भोईटे, डॉ. सुषमा चौधरी, युवती प्रमुख आरोही नेवे, रईसा पटेल, शिल्पा पाटील आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले.
माळी समाजाची कार्यकारिणी घोषित
जळगाव : महाराष्ट्र माळी संघाची सहकार भवन येथे रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
यामध्ये जिल्हाध्यक्षपदी शामराव पाटील, कार्याध्यक्ष भीमराव महाजन, कैलास माळी, प्रल्हाद माळी, अंतु लहासे, हनुमंत महाजन, राजेंद्र महाजन, दिनेश माळी, दिलीप माळी, देवीदास महाजन, गोकुळ रोकडे, विनोद पाटील, संतोष माळी आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
३५८ ग्रूपतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली उत्साहात
जळगाव : रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२३ जयंतीनिमित्त रविवारी ३५८ ग्रूप जळगाव शहरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅली काढण्यात आली. यावेळी राजू मोरे, सुरेश सोनवणे, समाजसेवक विशाल सोनवणे, ग्रृप संस्थापक अजय गरुड, अध्यक्ष पंकज सोनवणे, उपाध्यक्ष गणेश पगारे, सचिव सुनील शिरसाठ यांच्यासह
नितीन अहिरे, अक्षय निकम, संदीप वाघ, ललित पार्थी, शुभम इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रिपाइंतर्फे रमाईमाता जयंती साजरी
जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) तर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगरध्यक्ष सिद्धार्थ गव्हाणे, समता जागृती पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत घोडेस्वार, तालुकाध्यक्ष निकिता सोनवणे, शोभना भालेराव, निशा अडकमोल, शशिकला घोडेस्वार, प्रवीण परदेशी, अजीज शेख, फिरोज पिंजारी, अण्णा अडकमोल, रवींद्र जाधव, नरेंद्र सपकाळे, चंद्रकांत अहिरे, शरद धनगर, विजय पाटील उपस्थित होते.