आरोग्य सेविका चव्हाण, गायकवाड यांना फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्कार
By admin | Published: May 4, 2017 01:57 PM2017-05-04T13:57:45+5:302017-05-04T13:57:45+5:30
आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अडावद (ता. चोपडा) प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका चंद्रकला अविनाश चव्हाण व ढेकू (ता. अमळनेर)
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 04 - आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अडावद (ता. चोपडा) प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका चंद्रकला अविनाश चव्हाण व ढेकू (ता. अमळनेर) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यीका कल्पना लक्ष्मण गायकवाड यांना सन २०१७ चा ‘फ्लॉरेन्स नाईटिंगल’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथे १२ मे रोजी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरीत होणार आहे.
५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आरोग्य सेविका चंद्रकला अविनाश चव्हाण यांना प्रसुती व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, अपघात, क्षयरोग अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन २०१७ चा राज्यस्तरीय प्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आज ३ रोजी त्यांना दिल्ली येथुन आरोग्य विभागातून याबाबतची माहिती दुरध्वनीवरुन मिळाली. च्तर अमळनेर तालुक्यातील ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका कल्पना गायकवाड यांनाही सन २०१७ चा ‘फ्लॉरेन्स नाईटिंगल’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी २७ वर्षे सेवा झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
(वार्ताहर)