पदोन्नत्या रखडल्याने आरोग्य विभागच ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:59+5:302021-04-27T04:16:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने ...

The health department is on oxygen due to delays in promotions | पदोन्नत्या रखडल्याने आरोग्य विभागच ऑक्सिजनवर

पदोन्नत्या रखडल्याने आरोग्य विभागच ऑक्सिजनवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने शिवाय गेल्या तीन वर्षांपासून पदोन्नत्या रखडल्याने हा विभागाच सध्या बिकट परिस्थिती आहे. फ्रंट लाईनवर लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्या पदोन्नत्या नसल्याने ते गेल्या तीन वर्षांपासून वंचित असून अनेक महत्त्वाची कामे या विभागात रखडत आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आस्थापनेत मनुष्यबळाचा मुद्दा अनेक दिवसांपासून गंभीर होता. कर्मचारी नसल्याने वेतन रखडत असल्याचे मध्यंतरी प्रकार समोर आले होते. या विभागात वरिष्ठ, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, शिपाई, अशी अनेक पदे रिक्त असून ही पदे पदोन्नत्यांच्या माध्यमातून भरली जाणार आहे. मात्र, वर्षानुवर्षे हीच पदे भरली जात नसल्यानी आरोग्य सेवकांची आरोग्य सहायक व आरोग्य सहायकांची आरोग्य पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती रखडली आहे. २०१८ पासून ही प्रक्रियाच झालेली नाही.

कर्मचारी गंभीर झाल्यानंतर शिकावू काळाची आठवण

आरोग्य विभागात रुजू झालेल्या काही कर्मचाऱ्यांचे पाच पाच वर्षांपासून शिकावू काळच मंजूर झाले नसल्याची माहिती आहे. यात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली व या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर अखेर आरोग्य विभागाने या शिकावू काळाची फाईल हाती घेतली. तेव्हा पाच वर्षांपासून तो मंजूरच नसल्याचे समोर आले आहे. नियमानुसार एका वर्षभरात हा शिकावू काळ मंजूर करायचा असतो.

अशी आहेत पदे रिक्त

वरिष्ठ सहायक २ पदे रिक्त

कनिष्ठ सहायक ४ पदे रिक्त

सहायक लेखाधिकारी १ पद रिक्त

कनिष्ठ व वरिष्ठ लेखाधिकारी ४ पदे रिक्त

कनिष्ठ प्रशासन अधिकारी ३ पदे रिक्त

सांख्यिकी पर्यवेक्षक १ पद रिक्त

विस्तार अधिकारी आरोग्य ३ पदे रिक्त

आरोग्य सहायकाची पदोन्नती भरली जाणारी २३ पदे रिक्त

आरोग्य सहायक महिला पदोन्नती भरली जाणारी ३७ पदे रिक्त

आरोग्य पर्यवेक्षक पदोन्नती भरली जाणारी १७ पदे रिक्त

Web Title: The health department is on oxygen due to delays in promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.