जामनेरला आरोग्य विभागाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:29 PM2020-06-05T15:29:18+5:302020-06-05T15:30:55+5:30

शहरातील ज्या भागात अधिक रुग्ण आढळले आहेत व मागील काही दिवसात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे त्या भागात आठ पथकांकडून सर्वेक्षणाची मोहीम सुरू करण्यात आली.

Health department survey to Jamner | जामनेरला आरोग्य विभागाचे सर्वेक्षण

जामनेरला आरोग्य विभागाचे सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देखासगी दवाखाने सुरू करण्याची मागणी मागील काही दिवसात मृत्यूचे प्रमाण जास्त आठ पथकांकडून सर्वेक्षणाची मोहीम सुरू

जामनेर : शहरातील ज्या भागात अधिक रुग्ण आढळले आहेत व मागील काही दिवसात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे त्या भागात आठ पथकांकडून सर्वेक्षणाची मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, रुग्णांवर उपचारासाठी शहरातील खाजगी दवाखाने उघडण्याची मागणी या भागातील नागरीकांनी केली. काही खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी थांबवल्याने सर्वेक्षणास आलेल्यांसमोर संताप व्यक्त केला गेला.
पथकात नगरसेवक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचा समावेश आहे. तहसीलदर अरुण शेवाळे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, मुख्याधिकारी राहुल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.किरण पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.विजयसिंह पाटील, बशीर पिंजारी आशा कुयटे सहभागी झाले होते.

Web Title: Health department survey to Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.