आरोग्य विभागाचा गाडा ५० टक्के मनुष्यबळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:23+5:302021-04-19T04:14:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय आरोग्य यंत्रणेत आताही पूर्ण गाडा हा केवळ ५० टक्के मनुष्यबळावर ओढला जात आहे. ...

Health department's cart on 50% manpower | आरोग्य विभागाचा गाडा ५० टक्के मनुष्यबळावर

आरोग्य विभागाचा गाडा ५० टक्के मनुष्यबळावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय आरोग्य यंत्रणेत आताही पूर्ण गाडा हा केवळ ५० टक्के मनुष्यबळावर ओढला जात आहे. यात आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने बीएएमएस डॉक्टरांच्या तदर्थ म्हणून नियुक्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाच्या मुद्द्यावर केंद्रीय समितीनेही बोट ठेवले आहे. जिल्ह्यात १३२ कोविड रुग्णालये असून २५ कोविड सेंटर आहेत. खासगी कोविड रुग्णालयात प्रत्येकी ५ ते ७ आरएमओ तर सर्व रुग्णालयांमध्ये २०० पर्यंत कन्सलटंट असल्याची माहिती आहे. शासकीय यंत्रणेत हीच संख्या ५० टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२० परिचारिका आहेत. ही संख्या खूपच कमी असल्याने आहे त्या यंत्रणेवर ताण वाढला आहे. मध्यंतरी या ठिकाणी डॉक्टरांच्या संख्येबाबतही मोठी समस्या निर्माण झाली होती. कुशल मनुष्यबळ पुरेसे नसणे यामुळे आरोग्य सेवेत अडचणी असल्याचा मुद्दा नुकताच केंद्रीय समितीने मांडला होता.

Web Title: Health department's cart on 50% manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.