सफाईच्या ठेक्यातील मलिदा खाण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:48 AM2019-03-06T11:48:19+5:302019-03-06T11:48:31+5:30

शिवसेना नगरसेवकांचा आरोप

Health officials exchange food for cleanliness contracts | सफाईच्या ठेक्यातील मलिदा खाण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा घाट

सफाईच्या ठेक्यातील मलिदा खाण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा घाट

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्याचा बदलीवरुन सेना-भाजपा आमने-सामने

जळगाव : शहराच्या सफाईसाठी ७५ कोटी रुपयांचा एकच ठेका काढण्यात आला आहे. याच ठेक्यातील लाभ घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांचा बदलीचा घाट घालण्यात आला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपावर केला.
मंगळवारी मनपाच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची विशेष महासभा घेण्यात आली. यावेळी उपमहापौर सीमा भोळे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.
या सभेत मनपा प्रशासनाकडून व आयत्या वेळचे विषय मिळून एकूण २८ विषयांना महासभेने मंजुरी दिली.
मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या बदलीच्या सत्ताधाºयांकडून आलेल्या प्रस्तावावर सत्ताधारी भाजपा व विरोधक शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यासह शिवाजीनगर उड्डाणपुल बंद करुन पर्यायी रस्ता न दिल्याचा मुद्यावरुन सभेत सत्ताधारी व विरोधकांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले.
मनपाच्या जमिनीवर अनधिकृत व्यवसाय
मनपाने भूसंपादनात घेतलेल्या काही जमिनी मनपा प्रशासनाने अद्याप देखील ताब्यात घेतल्या नसून, त्या जमीनीचा वापर मुळ मालकांकडूनच होत असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली. या जमिनी मनपाने ताब्यात घ्याव्यात अशी मागणी लढ्ढा यांनी केली. तसेच या जमिनीवर अनेक अनधिकृत व्यवसाय सुरु असल्याची माहितीही लढ्ढा यांनी दिली.
कंत्राटी पध्दतीने भरले जातील कर्मचारी
मनपातील अनेक जागा रिक्त आहेत. मनपाकडून पाठविण्यात आलेला आकृतीबंद शासनाकडेच पडून असल्याने मनपाकडून कंत्राटी पध्दतीने अधिकारी व कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव सत्ताधाºयांकडून महासभेत मांडण्यात आला. तसेच सर्वानुमते हा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मनपात वृक्षधिकारी, क्रिडा अधिकाºयाचीही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला.
सेवानिवृत्त कर्मचाºयांची थकीत रक्कम अदा करण्याचा ठराव
सत्ताधाºयांकडून मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांचे अनेक वर्षांपासून मनपाकडे थकीत रक्कम असून, ती रक्कम अदा करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला. तसेच त्यांच्या रक्कमेविषयी धोरण निश्चित करण्याची मागणी देखील सत्ताधाºयांकडून करण्यात आली. तसेच नितीन लढ्ढा यांनी मनपातील १०२ न्यायालयीन कर्मचाºयांना ‘समान काम समान वेतन’ प्रमाणे वेतन देण्याची मागणी केली. तसेच प्रज्ञाचक्षू बांधवांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं देण्याचा प्रस्ताव देखील महासभेने मंजूर केला.
अभियंत्यांकडे आरोग्य विभाग खेदाची बाब - सचिन पाटील
सत्ताधारी भाजपाकडून मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या जागेवर डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला. यावेळी नगरसेवक सचिन पाटील यांनी मनपाचा आरोग्य विभाग अभियंत्यांकडे दिला असल्याने खेदाची बाब असल्याचे सांगत त्यांची बदली करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर महासभेने बहुमताने आरोग्य अधिकारी उदय पाटील यांची बदलीचा ठराव मंजूर करून घेतला.
पर्यायी रस्ता नसताना उड्डाणपुलाचा निर्णय अविवेकीपणाचा शिवाजीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र, हे काम करताना मनपा प्रशासनाने आधी नागरिकांच्या सुविधेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले. हा पुल बंद करण्याआधी मनपा प्रशासनाने पर्यायी रस्ता तयार न केल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला. मनपा प्रशासनाचा हा निर्णय अविवेकीपणाचा असल्याचा आरोप देखील लढ्ढा यांनी केला. यासह भाजपाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, अ‍ॅड.दिलीप पोकळे यांनी देखील मनपा प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी दर्शवली. तसेच पर्यायी रस्त्याची व्यवस्था लवकर करण्याची मागणी केली.

Web Title: Health officials exchange food for cleanliness contracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.