..अन् आरोग्याधिका:यांना सभापतींनी देऊ केली स्वत:ची गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 04:51 PM2017-05-12T16:51:14+5:302017-05-12T16:51:14+5:30

प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाईचा विषय: वाहन नसल्याचे कारण केले होते पुढे

..this health worker: The chairperson offered himself the car | ..अन् आरोग्याधिका:यांना सभापतींनी देऊ केली स्वत:ची गाडी

..अन् आरोग्याधिका:यांना सभापतींनी देऊ केली स्वत:ची गाडी

Next
>जळगाव, दि.12- प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई होत नसून बाजारात सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचा आरोप मनपा स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. त्यावर जाब विचारणा:या स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांना आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांनी  त्यांच्याकडे मनपाचे वाहन नसल्याचे कारण सांगितल्याने चिडलेल्या सभापतींनी त्यांना स्वत:च्या वाहनाची चावी देऊ केली. त्यानंतर मात्र आरोग्याधिका:यांनी नियमितपणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 
पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर गटारी, नाल्यांमध्ये अडकून पुराचे पाणी तुंबविणा:या प्लास्टिक पिशव्यांचा विषय स्थायी समिती सभेत उपस्थित झाला. यावेळी भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईच होत नसल्याची तसेच नाले सफाई करताना गाळ नाल्याच्या काठावरच टाकला जात असल्याची तक्रार केली. सभापतींनी आरोग्याधिका:यांना विचारणा केली असता त्यांनी गाळ पसरवून देऊ, असे उत्तर दिले. मात्र आयुक्तांनी ते चुकीचे असून गाळ उचलूनच नेला पाहिजे, असे बजावले. 
 

Web Title: ..this health worker: The chairperson offered himself the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.