काश्मिर खोऱ्यात महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून आरोग्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 08:17 PM2018-05-22T20:17:27+5:302018-05-22T20:17:27+5:30
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२२ - काश्मिरी जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे या हेतूने उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी १० दिवसात काश्मीर मधील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली. विशेष म्हणजे आरोग्यसेवेसह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे कार्यही या मंडळींनी तेथे केले.
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन व भारतीय सैन्य दलाच्या पुढाकारने आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील (जळगाव) यांच्या नेतृत्वाखाली डॉ.अभिजित रामोळे, डॉ.नितीन शाहीर, डॉ.निकिता चंडोले, डॉ.सोहम चंडोले, डॉ.रेखा चंडोले, डॉ.विलास चंडोले, डॉ.योगेश पवार, डॉ.प्रभाकर बेडसे, डॉ.सतीश साळुंखे, डॉ.विवेक जोशी, डॉ.योगेश पंजे,ऋषिकेश परमार (नाशिक) या महाराष्ट्रातील डॉक्टरांनी काश्मिरातील बांदीपुरा सेक्टर, अजस सेक्टर, संभल सेक्टर, गांदरबल सेक्टर, अशमुकम सेक्टर, बारामुल्ला सेक्टर, द्रास, कारगिल, मानसबल कंगण या अतिसंवेदनशील भागात वैद्यकीय सेवा दिली.
या आरोग्य शिबिरदरम्यान ४५०० रुग्णांनी लाभ घेतला. या वेळी रुग्णांना मोफत औषधीही देण्यात आली. यासाठी भारतीय सैन्याने औषधींचा साठा उपलब्ध करून तर दिलाच सोबतच डॉक्टरांच्या चमूने महाराष्ट्रातून सोबत आणलेली सुमारे एक लाख रुपयांची औषधी रुग्णांना वितरित करण्यात आली.