गाळेधारकांची ७ रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:04+5:302021-01-08T04:49:04+5:30
कमी धान्य मिळत असल्याची तक्रार जळगाव : तालुक्यातील लोणवाडी येथे एका स्वस्त धान्य दुकानावर साखर ३० रुपये किलोप्रमाणे मिळत ...
कमी धान्य मिळत असल्याची तक्रार
जळगाव : तालुक्यातील लोणवाडी येथे एका स्वस्त धान्य दुकानावर साखर ३० रुपये किलोप्रमाणे मिळत असून गहू, तांदूळ प्रत्येक कार्डधारकामध्ये एक ते दोन किलो कमी मिळत असल्याची तक्रारी गजानन पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे. गावातील लताबाई संजय चव्हाण यांच्या दुकानावर हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जास्त भावाने साखरेची विक्री केली जात असून याबाबत कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
२९८ रुग्ण घरीच
जळगाव : जिल्ह्यातील कोरानाच्या ४८२ सक्रीय रुग्णांपैकी २९८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहे. मध्यंतरी ही संख्या साडेतीन हजारांवर पोहोचली होती. काही निकष पूर्ण केल्यानंतर या रुग्णांना घरी उपचारांची प्रशासनाकडून परवानगी दिली जाते. मात्र, कालांतराने निकषही शिथील करण्यात आल्याचे चित्र होते. याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नव्हते.