गिरीश महाजनांच्या याचिकेवरील सुनावणी लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:30+5:302021-01-08T04:50:30+5:30
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या वादातून निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद रद्द करण्यासंदर्भात ...
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या वादातून निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद रद्द करण्यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी कामकाज होणार होते; मात्र ते होऊ शकले नाही. यावर २७ जानेवारी रोजी आता सुनावणी होणार आहे.
गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, तानाजी भोईटे, सुनील झंवर, नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह २९ जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा कोथरुड पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, ही फिर्याद रद्द करण्यासाठी गिरीश महाजन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर न्या.एस.एस.शिंदे व न्या.एम.एस.कर्णिक यांच्यासमोर ७ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. आता २७ रोजी सुनावणी होणार असून, या दिवशी फिर्यादी व सरकार पक्षाला उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.