किंचाळण्याचा आवाज ऐकला, समोर पाहिले तर आईने गळफास घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:41+5:302021-06-06T04:12:41+5:30

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बाहेर बसलेल्या मुलाला घरात किंचाळण्याचा आवाज आला.. हा आवाज ऐकून धावतच घरात गेला.. ...

Hearing the screams, looking in front, the mother choked | किंचाळण्याचा आवाज ऐकला, समोर पाहिले तर आईने गळफास घेतला

किंचाळण्याचा आवाज ऐकला, समोर पाहिले तर आईने गळफास घेतला

Next

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बाहेर बसलेल्या मुलाला घरात किंचाळण्याचा आवाज आला.. हा आवाज ऐकून धावतच घरात गेला.. समोर बघितले तर आईने गळफास घेतल्याचे दृश्य दिसले. थरथरणाऱ्या हातांनी तातडीने आईला खाली उतरवले तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र आई जग सोडून निघून गेली होती.

एमआयडीसीतील भारत गॅस परिसरातील एम सेक्टरमध्ये असलेल्या सुधाकर नगराथ सिंधुबाई वामन बुनकर (वय ६०) या वृध्देने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता घडली. आजाराने कंटाळून वृध्देने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधूबाई वामन बुनकर या सुधाकर नगर येथे भारत गॅस जवळ कुटुंबासह वास्तव्यास होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. शनिवारी दुपारी अडीच वाजता मुलगा जगदीश हा घराच्या बाहेर असताना आत मध्ये किंचाळण्याचा आवाज आला आला. मोठ्याने आवाज आल्याने जगदीश याने आवाजाच्या दिशेन धाव घेतली असता, आई सिंधुबाई या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे महेंद्र गायकवाड, शांताराम पाटील रुग्णालयात धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला आहे. त्यानंतर शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आजारपणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिंधुबाई यांच्या पश्चात पती, मुलगा, ३ मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी मेहरुणमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Hearing the screams, looking in front, the mother choked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.