मू.जे़ महाविद्यालयात शनिवारी हृदयरोग निदान कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:01 PM2019-11-27T22:01:08+5:302019-11-27T22:15:45+5:30
जळगाव - अनावश्यक चिंता, काळजी, तणाव आदींमुळे रक्तदाब आणि हृदय रोग यांनी अनेक लोक त्रस्त झालेले आहेत. ह्रदय रोग ...
जळगाव - अनावश्यक चिंता, काळजी, तणाव आदींमुळे रक्तदाब आणि हृदय रोग यांनी अनेक लोक त्रस्त झालेले आहेत. ह्रदय रोग टाळता येऊ शकतो का? त्याची लक्षणे आणि कारणे कोणती? त्यासाठी काय काळजी घ्यावी? हे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मू़जे़ महाविद्यालयातील निसर्गोपचार विभाग आणि माधवबाग कार्डियाक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर रोजी हृदयरोग निदान कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बुधवारी प्रा़ आरती गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
यावेळी पत्रकार परिषदेत प्रा़ सोनल महाजन, डॉ़ श्रध्दा महाजन, प्रा़ अनंत महाजन, डॉ़ देवानंद सोनार, संदीप केदार आदींची उपस्थिती होती़
कार्यशाळा ही मू़जे़ महाविद्यालयात होणार असून सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार आहे़ या कार्यशाळेमध्ये मुंबई येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ. मिलिंद सरदार आणि डॉ. प्रशांत याकुंडी हे मार्गदर्शन करणार आहेत़ तर आतापर्यंत ७५ नागरिकांनी नोंदणी केली असल्याचीही माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली़ या कार्यशाळेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा़ सोनल महाजन यांनी केले आहे़