पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार

By विजय.सैतवाल | Published: July 1, 2024 12:24 AM2024-07-01T00:24:52+5:302024-07-01T00:25:30+5:30

दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच भरधाव कारच्या धडकेत रामदेववाडी जवळ चौघांना जीव गमवावा लागण्याची घटना घडल्यानंतरही असे अपघात सुरूच आहे.

Heat and run again; A speeding car collides with a two-wheeler, the driver escapes | पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार

पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार

जळगाव : दुचाकीवरुन घरी जात असलेले गणेश बळीराम बाक्षे (६३, रा. पार्वतीकाळे नगर) यांना भरधाव कारने धडक देत कारचालक पसार झाला. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री मोहाडी रोड ते राकेश नगर दरम्यान घडली. जखमी बाक्षे यांच्या नाक व कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच भरधाव कारच्या धडकेत रामदेववाडी जवळ चौघांना जीव गमवावा लागण्याची घटना घडल्यानंतरही असे अपघात सुरूच आहे.

खाजगी कंपनीतून निवृत्त झालेले गणेश बाक्षे हे रविवारी सायंकाळी  दुचाकीने घरी परतत होते. घरापासून अवघ्या काही अंतरावर असताना मोहाडीकडून राकेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना मागून भरधाव  कारने धडक दिली. यामध्ये बाक्षे हे दुचाकीवरुन खाली कोसळल्याने त्यांच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांच्या कानातून आणि नाकातून रक्तस्त्राव होवू लागला.  त्या परिसरात राहणारे दीपक परदेशी यांच्यासह नागरिकांनी  घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वृद्ध बाक्षे यांच्या मोबाईलमधील क्रमांकावरुन त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.
त्यावेळी बाक्षे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  गणेश बाक्षे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.  त्यांच्या फुफुसाला देखील मार लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सिटीस्कॅन करण्यास सांगितले असून त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरु आहेत.

कारमध्ये तरुण
मोहाडीकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारमध्ये तरुण असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वृद्धाला धडक दिल्यानंतर हे तरुण तेथे न थांबता पसार झाले. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

Web Title: Heat and run again; A speeding car collides with a two-wheeler, the driver escapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.