कन्हेरे येथील तरूणाचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 10:51 PM2017-04-05T22:51:41+5:302017-04-05T22:51:41+5:30

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, उन्हामुळे पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील एका ३२ वर्षीय युवकाचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे.

Heat death in Kanher | कन्हेरे येथील तरूणाचा उष्माघाताने मृत्यू

कन्हेरे येथील तरूणाचा उष्माघाताने मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 05 -  गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, उन्हामुळे पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील एका ३२ वर्षीय युवकाचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे.
तुकाराम सांडू पाटील (३२) हा तरूण ४ रोजी शेतात गेला होता. तेथे त्याला उन लागले. ५ रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. त्याला उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्याचा घरीत मृत्यू झाला. त्याला पारोळा येथील कुटीर रूग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी त्या तरूणास ऊन लागल्याचे सांगत त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सांडू पाटील यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल प्रकाश चौधरी करीत आहेत. 

Web Title: Heat death in Kanher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.