जळगावकरांना उन्हाचा चटका अन् भारनियमनाचा फटका

By admin | Published: March 31, 2017 10:48 AM2017-03-31T10:48:52+5:302017-03-31T10:48:52+5:30

महावितरण संचालक संचलनाने वीज बील थकबाकी वसुली व वीजगळतीच्या प्रमाणानुसार ग्रुप तयार केले असून शहरात ठरवून दिलेल्या धोरणानुसार भारनियमन केले जात आहे.

Heat shock and load injuries to Jalgaonkar | जळगावकरांना उन्हाचा चटका अन् भारनियमनाचा फटका

जळगावकरांना उन्हाचा चटका अन् भारनियमनाचा फटका

Next

 , दि.31- महावितरण संचालक संचलनाच्या परिपत्रकानुसार वीज बील थकबाकी वसुली व  वीजगळतीच्या प्रमाणानुसार ग्रुप तयार करण्यात आले असून शहरात परिपत्रकातील ठरवून दिलेल्या धोरणानुसार भारनियमन करण्यात येत आहे. विविध भागांमध्ये तीन ते नऊ तासांर्पयत नियोजित भारनियमन केले जात असल्याने उन्हाचा चटका अन् त्यातच भारनियमन यामुळे नागरिकांचे हाल होत आह़े

महावितरण कंपनीचे जळगावात शहरी भाग एक मध्ये 33 तर शहरी दोन मध्ये 20 असे एकूण 53 फीडर आहेत़ थकबाकी वसुली व वीजचोरी, गळतीच्या प्रमाणानुसार ग्रुपमध्ये फिडरची विभागणी करण्यात येत़े ग्रुपमध्ये समाविष्ट फीडरवरील भागांमध्ये परिपत्रकात ठरवून दिलेल्या वेळेनुसार भारनियमन करण्यात येत आहे. दर महिन्याला ग्रुप बदलतात़ त्यानुसार भारनियमाचे तासही बदललात़
 
ग्रुपमध्ये फिडरची विभागणी
थकबाकी भरणा व वीजगळतीच्या प्रमाणानुसार ए, बी, सी, डी, ई, एफ, जी 1, जी 2, जी 3, आणि ङोड असे ग्रुप तयार करण्यात आले आह़े नियमित थकबाकी भरणा व वीजगळती शून्य असलेल्या फीडरवरील भागांचा ए, बी, सी, ग्रुपमध्ये समावेश आह़े वीजचोरी जास्त व थकबाकीही जास्त असलेल्या फीडरवरील भागांचा ङोड तसेच जी 3 मध्ये समावेश आहे. ग्रुपनुसार भारनियमाच्या कमी अधिक वेळाही ठरल्या आहेत़
आपत्कालीन भारनियमामुळे त्रासात भर
महावितरण कंपनीकडून उपलब्धतेपेक्षा विजेची मागणी वाढली  तरच हे नियोजित भारनियमन केले जात़े मात्र नियमित भारनियमनाची आपत्कालीन भारनियमाचा संबंध नसल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ए़जी़इंगळे यांनी सांगितल़े मात्र नियोजित भारनियमनात आपत्कालीन भारनियमामुळे नागरिकांच्या त्रास भर पडून असह्य उकाडा झालेला आह़े
ग्रुपनुसार असे होते भारनिमयमन
ग्रुपतास
3़15
बी4़00
सी4़45
डी5़30
6़15
एफ7़00
जी 17़45
जी 28़30
जी39़15
अर्बन 1 मधील ग्रुपनुसार फीडर
ए - भारत पेट्रोलियम, गणपती नगर, बालाजी, एमआयडीसी, इंडस्ट्री, कलेक्टर ऑफिस 
बी - गितांजली केमिकल्स, रूबी सजिर्कल, ओंकारेश्वर मंदिर, प्रभात कॉलनी 
सी-  टेलीफोन नगर, शिवतिर्थ मैदान
डी- शारदा कॉलनी, भगवान नगर, शिवकॉलनी
ई-लक्ष्मीनगर, स्वातंत्र्य चौक
एफ- गायत्रीनगर, बळीराम पेठ
जी 3- खेडी शिवार, सुप्रिम कॉलनी
ङोड- लोकमत एमआयडीसी परिसर, मेहरूण,  गिरणा पंपिंग,  किरण पाईप, आकाशवाणी, बहिणाबाई उद्यान

Web Title: Heat shock and load injuries to Jalgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.