जळगावात पुन्हा उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:24 PM2018-05-17T18:24:32+5:302018-05-17T18:24:32+5:30
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैराण झाले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि. १७ - गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैराण झाले.
कर्नाटक व दक्षिण महाराष्टÑात तयार झालेल्या कोमोरिन क्षेत्रामुळे शहरात मंगळवार व बुधवारी ढगाळ वातावरण मिळाले. त्यामुळे तापमानात देखील घट पहायला मिळाली. त्यातच काही आर्द्रतेत देखील वाढ झाल्यामुळे असह्य उन्हाची दाहकता देखील काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, गुरुवारी उन्हाचे प्रमाण देखील वाढले होते. त्यातच वाऱ्यांचा वेग देखील जास्त असल्याने उन्हाच्या झळांनी नागरिकांना अक्षरश: हैराण करून सोडले.
‘लु’ वाºयांमुळे उष्णतेची लाट
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जरी जळगावकरांना दिलासा मिळाला असला तरी आगामी पाच दिवस जळगावकरांसाठी धोक्याचे असण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. शहरात २१ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान ४५ अंशा वर राहण्याची शक्यता आहे. राज्यातील नाशिक, पुणे व कोकणमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी उत्तर महाराष्टÑातील जळगावसह विदर्भातील इतर जिल्ह्यात ‘लु’ वा-यांचे प्रमाण कायम राहणार असल्याने उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.