पाचोरा शहरातील हिवरा नदीला मध्यरात्रीनंतर मोठा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:46 PM2020-09-18T19:46:41+5:302020-09-18T19:46:46+5:30
कृष्णापुरी भागाचा शहराशी संपर्क तुटल्याने कृष्णापुरी वासीयांना फेऱ्याने यावे लागले.
पाचोरा : शहरातील हिवरा नदीला मध्यरात्रीनंतर मोठा पूर आला. दि १८ रोजी सकाळी ७ चे सुमारास पाचोरा शहरातील कृष्णापुरी पुलावरून महापुराचे पाणी वाहू लागले. यामुळे कृष्णापुरी भागाचा शहराशी संपर्क तुटल्याने कृष्णापुरी वासीयांना फेºयाने यावे लागले. पाचोरा शहरासह तालुक्यात कोठेही पाऊस न पडता महापूर आला. औरंगाबाद जिल्ह्यात व डोंगर पट्ट्यात ढगफुटी झाल्याने महापूर आला.संध्याकाळ पर्यंत पाणी हळूहळू ओसरू लागले.