गारपीट व वादळामुळे रब्बीचे पिकाचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:14 PM2020-03-18T13:14:10+5:302020-03-18T13:14:53+5:30
‘कोरोना’ नंतर आता निसर्गाचाही कहर, गहू, हरभऱ्याला फटका
जळगाव : शहरासह तालुक्यातील भोकर, आव्हाणे, ममुराबाद, कानळदा, गाढोदा, किनोद गिरणा व तापी काठच्या गावांमध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपीटी झाली. त्यात गहू, हरभºयासह केळीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सूमारेतासभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले गेले आहे. आधीच ‘कोरोना’मुळे शेतीचे व्यवहार ठप्प असताना आता निसर्गानेही आपले रौद्ररुप दाखविल्याने शेतकºयांचा चिंता वाढल्या आहेत.
जळगाव शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील गाढोदा, पळसोद भोकर, कठोरा, किनोद , आव्हाणे या भागात जोरदार वाºयासह झालेल्या पाऊस व गारपीटीने चांगलाच हाहाकार माजवला. म्हसावद, वडली, जळके या भागात वादळ होते. ऐन काढणीवर असलेल्या गहू व हरभºयाचा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.
भोकर भागात अर्धातात गारपीट
तहसिलदार वैशाली हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार भोकर पट्टयात मोठे नुकसान झाले असून, या भागात अर्धातास गारपीट झाली आहे. रात्री उशीरापर्यंत नुकसानीचा आढावा घेतला जात होता.
ममुराबादला घरांवरील पत्रे उडाले
ममुराबाद : परिसरात मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या गहू, दादर ज्वारी पिकांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले असून वादळामुळे काही घरांवरील पत्रेही उडाली आहेत.दिवसभर कडक ऊन व उकाड्याची स्थिती असतांना सायंकाळनंतर वातावरणात अचानक मोठा बदल झाला. वाºयाचा वेग वाढून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यावर रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाट व पाऊस सुरू होता. साधारण पाच मिनिटे बोरांच्या आकाराची गार पडली. रस्त्यांवर तसेच घरांच्या अंगणात अक्षरश: गारांचा सडा पडल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकांचे गारपिटीमुळे काय हाल झाले असतील, या कल्पनेनेच शेतकºयांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. वादळामुळे दत्त मंदिराजवळील श्रीराम यादव यांच्या घरावरील पत्रेही उडाली.
गारपीटीमुळे शेकडो हेक्टरवरील गहू झाला आडवा
२५ ते ३० किमी प्रतीतास वेगाने वाहणाºया वाºयामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, गाढोदा ते आव्हाणे या केळी पट्टयात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हजारो हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे. यासह पावसासह झालेल्या गारपीटीमुळे शेकडो हेक्टरवरील गहू व हरभºयाचे पिक अक्षरश आडवे झाले होते. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा आढावा घेवून शेतकºयांना मदत करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.