बळीराजा सुखावला : जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 12:40 PM2018-08-16T12:40:21+5:302018-08-16T12:42:15+5:30
तब्बल बावीस दिवससांच्या दडी नंतर चांगला पाऊस
जळगाव : स्वातंत्रदिन साजरा होताच सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी १६ आॅगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात पहाटेपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे कोमेजलेल्या पिवळट शेतशिवाराने पुन्हा हिरवा शालू परीधान करण्यास मदत होण्यासह दुष्काळाच्या शक्यतेत सापडलेला बळीराजा आनंदाने सुखावला आहे. तब्बल बावीस दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पाऊसामुळे शेतकºयांना मोठा आधार झाला. त्यामुळेच आनंदलेला बळीराजा या पावसाला संजिवनी देणारा आधार पाऊस असे म्हणत आहेत.
जळगाव शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झालेले नव्हते.
जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या कपाशी पिकांचे बोंडे पक्वतेकडे, मक्का फुलोºयात, उडीद, मूग, चवळी,भरणी व तोडणीवर असतानाच पावसाने गेल्या २३ जुलै पासून दडी मारली होती. सततच्या धुक्कट व दमट वातावरणाने पिके पिंगट पडत होते व रोगराई वाढत होती. फुलोºयातील मका कोमेजून वाकत होता. शेतीजन्य खर्चाची मशागत कामे निंदनी, कोळपणी, फवारणी, नियमीत करावीच लागत होती. दुष्काळाचे सावट व खर्चाचा बोजा यामुळे शेतकरी हतबल झाला होता. या गंभीर स्थितीत धाऊन आलेला हा पाऊस शेतकरींसाठी संजिवणीच ठरला असून एक मोठा आधार व हंगामाची आशा पल्लवीत झाली आहे.
रावेर तालुक्यातील पाल परिसरताली सुकी नदीला पूर आला. यावल तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. पाचोरा येथे अर्धा तास पाऊस झाला. या शिवाय जामनेर तालुक्यातही सर्वत्र पाऊस आहे.