सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By admin | Published: September 19, 2015 12:21 AM2015-09-19T00:21:57+5:302015-09-19T00:21:57+5:30

कपाशीचे अतोनात नुकसान : शेंदुर्णी परिसरात पिकांना फटका

Heavy rain in seven talukas | सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

Next

जळगाव- शहरासह जिल्हाभरात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, यावल, पाचोरा या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये 16 तासात 60 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

24 तासात 939.71 मि.मी. पाऊस

गुरुवारी दुपारी 4.20 वाजेपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी सकाळी 9.30 वाजेर्पयत सुरूच होता. सुरुवातीला मध्यम स्वरूपाच्या पावसाने रात्री जोर धरला. सकाळर्पयत जोरदार पाऊस सुरू होता. गेल्या 24 तासात जिल्हाभरात तब्बल 939.71 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जामनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात सर्वाधिक 116.75 मि.मी. पावसाची नोंद जामनेर तालुक्यात, तर सर्वात कमी 35.75 मि.मी. पावसाची नोंद भडगाव तालुक्यात झाली आहे. जळगाव तालुक्यात 79.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तीन महिन्यानंतर गिरणा वाहू लागली

13 ते 17 जून यादरम्यान एरंडोल, पाचोरा, भडगाव भागात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा नदीला प्रवाही पाणी आले होते. नंतर जुलै, ऑगस्टमध्ये हवा तसा पाऊस नसल्याने नदीमधील पाणी आटले होते. गिरणा नदीकाठावरील भागात म्हणजेच पाचोरा, भडगाव, जळगाव, चाळीसगाव, एरंडोलात ब:यापैकी पाऊस झाल्याने गिरणा नदीला पाणी आले आहे.

शेंदुर्णीत लाखोंचे नुकसान

शेंदुर्णी परिसरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शेतातील झाडे, इलेक्ट्रिक पोल पडून मोठे नुकसान झाले. तसेच काही ठिबकवर असलेल्या केळीच्या बागा, कपाशी व मका पूर्णपणे झोपला. नदीकाठी असलेल्या मांगरवाडी, कोळी समाजातील ब:याच लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचा संसार उघडय़ावर पडला. पुरामुळे बेघर झालेल्या 200-250 लोकांना जेवणाची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण चौधरी व त्यांच्या मित्र परिवाराने शाळेत केली. जि.प. सदस्य संजय गरुड, पंचायत समिती सदस्य शांताराम गुजर, जि.प. माजी सदस्या समिती सरोजिनी गरुड, जि.प. माजी सदस्य सागरमल जैन, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव थोरात, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पंडितराव जोहरे यांनी गावात फिरून नुकसान झालेल्या घरांना भेटी देऊन मदत केली.

गावात सलग 12 तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

एरंडोल तालुक्यात 15 तास पाऊस

एरंडोल तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी 11 वाजेर्पयत पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. मात्र सुदैवाने कुठेही प्राणहानी अथवा वित्तहानी झाली नाही. अंजनी धरणाच्या क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाणीसाठय़ात वाढ झालेली नाही. सर्वाधिक म्हणजे 112 मि.मी. पाऊस रिंगणगाव मंडळात झाला. उत्राण मंडळात 75 मि.मी., कासोदा मंडळ 53 व एरंडोल मंडळात 35 मि.मी. जलवृष्टी झाली. शुक्रवारअखेर 413 मि.मी. पाऊस झाला.

Web Title: Heavy rain in seven talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.