जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस, अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:40 PM2020-06-14T12:40:44+5:302020-06-14T12:41:36+5:30
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस होऊन अनेक ठिकाणी नुकसान झाले. यामध्ये अमळनेर तालुक्यात अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. ...
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस होऊन अनेक ठिकाणी नुकसान झाले. यामध्ये अमळनेर तालुक्यात अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. तेथे ६६.३८ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण ३२१ मि.मी. पाऊस झाला.
शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर शनिवारीदेखील जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यात चाळीसगाव तालुक्यात शून्य मि.मी. पावसाची नोंद झाली.
रविवारी जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागात अतिवृष्टीदेखील होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी रात्री १९१.८ मि.मी. पाऊस झाला. यात चाळीसगाव तालुक्यात २७ हेक्टरवर ६९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.
शुक्रवार, १२ जून रोजी संध्याकाळी चाळीसगावसह अमळनेर व इतरही तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. चाळीसगाव तालुक्यात वेगवान वाºयामुळे केळी, पेरु, लिंबू, मोसंबी पिकांचे नुकसान झाले. ३३ टक्क्यांच्यावर हे नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे.