जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाने बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:41 PM2018-07-17T12:41:29+5:302018-07-17T12:42:59+5:30
दिलासा
जळगाव : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली़ त्यामुळे शहरवासियांसह बळीराजा सुखावला आहे़ दरम्यान, सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. परंतू, दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहनधारकांसह विक्रेत्यांची धावपळ उडाली़
गेली दोन दिवस शहरात पावसाने हजेरी लावली होती़ सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत रिपरिप पाऊस झाला. त्यामुळे लहान-मोठ्या खड्डयांमध्ये पाणी साचले होते़ सलग तिसºया दिवशी झालेल्या पावसामुळे बळीराज्याच्या चेहºयावर आनंद दिसून आला़ भरपावसात गिरणा पंपिग परिसरात शेतकरी काम करीत असल्याचे दिसून आले़ तोच दुपारी दीड वाजता पुन्हा रिमझीम पावसाला सुरूवात झाली़ त्यानंतर अडीच ते चार वाजेच्या सुमारास दमदार सरी कोसळल्या.
पाऊस येताच वीज गुल
पावसाप्रमाणे सलग तिसºया दिवशी देखील वीजेचा लपंडाव सुरूच होता़ ज्या-ज्या वेळी पावसाला सुरूवात झाली़ त्या-त्या वेळी अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता़ परंतू, काही मिनिटांनी तो सुरळीत करण्यात आला़
बजरंग बोगद्यात रिक्षा अडकली
बजरंग बोगद्यात पाणी साचले आहे. त्यातून रिक्षा काढत असताना त्यात ती अडकली. प्रयत्न करुनही ती निघत नव्हती.
दुचाकीचा अपघात
पावसामुळे अनेक ठिकाणी दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडल्या़ छत्रपती क्रीडा संकुलाजवळ सायंकाळी ५ वाजता दुचाकीवरून जात असलेल्या तरूणाचा अपघात होऊन तो जखमी झाला़ यात तरूणाच्या दुचाकीचे चांगलेच नुकसान झाले होते़