जळगावात मुसळधार पाऊस ; वीज पडून एक ठार तर दुसरा जखमी

By Admin | Published: June 11, 2017 12:41 PM2017-06-11T12:41:41+5:302017-06-11T12:41:41+5:30

शहर व तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने मेहरुण भागातील अनेक कॉलन्यांमधील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

Heavy rains in Jalgaon Electricity hit one and one injured | जळगावात मुसळधार पाऊस ; वीज पडून एक ठार तर दुसरा जखमी

जळगावात मुसळधार पाऊस ; वीज पडून एक ठार तर दुसरा जखमी

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.11 : शहर व तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने मेहरुण भागातील अनेक कॉलन्यांमधील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. तर जळगाव तालुक्यातील कुसुंबा खु.।। येथे रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज पडल्याने प्रकाश गुलाब पावरा (वय 38) या तरुणाचा मृत्यू झाला तर खंडू सुकलाल पावरा (वय 35) हा जखमी झाला. 
शनिवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. रविवारी सकाळी साडे सात वाजेर्पयत सुरुच होता. या साडे पाच तासात 74.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झाल्याने शहरातून जाणा:या नाल्यांना पूर आला. नाल्याच्या काठावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. या पुरात दोन दुचाकीही वाहून गेल्या.  जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 296.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

Web Title: Heavy rains in Jalgaon Electricity hit one and one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.