पारोळ्यात दमदार पावसामुळे पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:11 AM2021-07-22T04:11:36+5:302021-07-22T04:11:36+5:30
गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असताना पारोळ्यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने बिनधास्त सुरू असतात. ...
गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असताना पारोळ्यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने बिनधास्त सुरू असतात. यावर महसूल, पालिका, व पोलीस प्रशासन कारवाईबाबत मात्र एकमेकांच्याकडे बोट दाखवत असतात. जिल्हाधिकारी यांनी वीकेंडचे निर्बंध घातले असताना रविवारी मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी पाहण्यास मिळते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचाच प्रत्यय येत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक कारवाई झाली. अचानक कारवाईचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. मात्र यात सातत्य असावे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. कारण कोरोना अद्याप संपलेला नाही. तिसऱ्या लाटेची भीती आहेच त्यामुळे अगोदरच सावधना बाळगली जावी, लसीकरणाचा वेग वाढविला जावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.