नेरपाट येथे भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 11:52 AM2017-06-09T11:52:29+5:302017-06-09T11:52:29+5:30
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
Next
ऑनलाईन लोकमत
रत्नापिंप्री, जि.जळगाव, दि.9 : येथून जवळच असलेल्या नेरपाट येथील ग्रामस्थांना तीन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाई निवारणार्थ ग्राम पंचायत व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ महिलां करीत आहेत
सडावण गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आहे हे गाव पारोळा-अमळनेर तालुक्याच्या सीमारेषेवर आहे. गावापासून सात किलोमीटर अंतरावरावरील चिखलोद गृप ग्राम पंचायतीला हे गाव जोडण्यात आले आहे.
या गावाकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. गावाला दरवर्षी पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.
सध्या गावातील पाणी टंचाइची गंभीर समस्या आहे. नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. गावातील चौकात एकच हात पंप असून अबालवृद्ध या हात पंपाच्या पाण्याचा वापरत करीत आहे. तर पिण्यासाठी पाणी चक्क सडावण गावाच्या सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागत आहे. नेरपाट गावासाठी विहिर अधिग्रहित केली होती. मात्र विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने येथील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. मात्र गावासाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे गावात तीव्र पाणी टंचाइला सामोरे जावे लागत आहे. तरी गावासाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नेरपाट येथील महिलांनी केली आहे