सात पोलिसांसह ७५ सरकारी कर्मचाऱ्यांवर हेल्मेटची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 10:37 PM2020-01-30T22:37:27+5:302020-01-30T22:38:21+5:30

खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली.

Helmet action against seven policemen, and 75 Government servants | सात पोलिसांसह ७५ सरकारी कर्मचाऱ्यांवर हेल्मेटची कारवाई

सात पोलिसांसह ७५ सरकारी कर्मचाऱ्यांवर हेल्मेटची कारवाई

Next

जळगाव : रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सरकारी कर्मचाºयांना हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी शहर वाहतूक शाखेतर्फे ७५ सरकारी कर्मचाºयांवर हेल्मेटची कारवाई करण्यात आली. त्यात सात पोलिसांचाही समावेश आहे. या ७५ जणांकडून ३७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांनी ‘लोकमत’ ला दिली.


खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीत १६ सदस्यांची नवीन समिती गठीत करण्यासह गुरुवारपासून सरकारी कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर, उपनिरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद व इतर सरकारी कार्यालयात दिवसभरात ७५ जणांवर हेल्मेटबाबत कारवाई करण्यात आली.

हेल्मेट नसलेल्या दुचाकीधारकाकडून ५०० तर विना सीट बेल्ट चारचाकी चालविणाऱ्यांना दोनशे रुपये दंड करण्यात आला. सीटबेल्टची १२ जणांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेत ११ जणांवर कारवाई झाली तर विना सीटबेल्ट कार चालविणाºया एका पोलिसावर कारवाई करण्यात आली. हेल्मेटचा वापर न करणाºया ६ पोलिसांकडूनही प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला

Web Title: Helmet action against seven policemen, and 75 Government servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.