अॅपच्या मदतीने झाला ‘मृदा विज्ञान’चा अभ्यास सोपा

By admin | Published: May 15, 2017 05:19 PM2017-05-15T17:19:22+5:302017-05-15T17:19:22+5:30

‘सॉईल सायन्स- अॅट अ ग्लान्स’ हे पुस्तक भडगाव तालुक्यातील भातखंडे या छोटय़ाशा गावातील डॉ.गोपाल महाजन यांनी अॅपच्या स्वरूपात तयार केले आहे.

With the help of an app, 'Soil Science' is easy to study | अॅपच्या मदतीने झाला ‘मृदा विज्ञान’चा अभ्यास सोपा

अॅपच्या मदतीने झाला ‘मृदा विज्ञान’चा अभ्यास सोपा

Next

संजय पाटील / ऑनलाइन लोकमत

भातखंडे, जि. जळगाव, दि. 15 - ज्युनिअर रिसर्च फेलोशिप, सिनियर रिसर्च फेलोशिप, भारतीय प्रशासकीय सेवा समकक्ष अॅग्रीकल्चर रिसर्च सव्र्हिसेस या परीक्षेच्या ‘मृदा विज्ञान’ या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे ‘सॉईल सायन्स- अॅट अ ग्लान्स’ हे पुस्तक भडगाव तालुक्यातील भातखंडे या छोटय़ाशा गावातील  डॉ.गोपाल महाजन यांनी अॅपच्या स्वरूपात तयार केले आहे.  यामुळे हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडून व अॅपच्या माध्यमातून गंमतीशीररित्या सहज या विषयाचा अभ्यास करण्याची संधी डॉ. महाजन यांनी उपलब्ध करून दिली आहे.
भातखंडे बुद्रुक ता.भडगाव येथील मूळ रहिवासी तसेच ‘मृदा विज्ञान’ या विषयात पी.एचडी केलेले डॉ.गोपाल महाजन हे  सध्या  गोवा येथे कृषी शास्त्रज्ञ (मृदा विज्ञान) म्हणून आय.सी.आर. केंद्रीय किनारा कृषी संशोधन केंद्रात कार्यरत आहेत.
मृदा विज्ञान या विषयाकडे  विद्याथ्र्याचा फारसा कल नसतो.  त्यामुळे हा विषय सोपा वाटावा व त्याकडे कल वाढावा यासाठी हा विषय  अधिकाधिक विद्याथ्र्यार्पयत पोहचण्यासाठी डॉ.महाजन यांनी ‘सॉईल सायन्सेस - अॅट अ ग्लान्स’ पुस्तक लिहिले. 
भारतीय प्रशासकीय सेवा समकक्ष अॅग्रीकल्चर रिसर्च सव्र्हिसेस  परीक्षेत देशात तिसरा क्रमांक मिळविला असून चांगली नोकरीही आहे.  मात्र इतरही विद्याथ्र्याना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी डॉ. महाजन हे केवळ पुस्तक लिहूनच थांबले नाही तर त्यांनी त्यातही अभिनव आणि नाविन्य म्हणून  याच पुस्तकाचे मोबाईल अॅप बनविले.
या अॅपचे नाव ‘ऑब्जेक्टीव्ह सॉइल सायन्स’ असे असून विद्याथ्र्याना अगदी गमतीशीर पद्धतीने अभ्यास करता यावा व त्यांच्यार्पयत थेट पोहचता यावे हा या मागचा उद्देश असल्याचे महाजन यांनी सांगितले.  विद्याथ्र्याची अडचण लक्षात घेता हे अॅप त्यांनी सर्वासाठी मोफत केले आहे.
अवघ्या सहा महिन्यात या अॅपचा लाभ भारत, पाकिस्तान, फिलीपाईन्स, नायजेरिया, बांगलादेश, नेपाळ अशा अनेक देशातील जवळपास 3200 विद्याथ्र्यानी घेतला आहे.
जगात कोणताही व्यक्ती हे अॅप विनामूल्य आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करू शकतो.
या अॅपमध्ये 81 क्विझ आहे. प्रत्येक क्विझमध्ये 30 प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाच्या चार उत्तरापैकी योग्य उत्तर निवडल्यास त्यानंतरचा प्रश्न सोडवायला मिळेल.

विद्याथ्र्याना उच्च परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी याचा लाभ होऊ शकतो. हे अॅप विनामूल्य असून कोणतीही व्यक्ती आपल्या मोबाईल फोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करू शकतो. दरवर्षी 20 लाख उत्पन्न देणारे अॅप विद्याथ्र्यासाठी विनामूल्य आहे.
-डॉ.गोपाल महाजन

Web Title: With the help of an app, 'Soil Science' is easy to study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.