भेटीगाठीसोबत मदतही आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:20+5:302021-04-19T04:14:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे वृद्धाश्रमात असलेल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भेटता येत नसून या ...

Help came along with the meeting | भेटीगाठीसोबत मदतही आटली

भेटीगाठीसोबत मदतही आटली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे वृद्धाश्रमात असलेल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भेटता येत नसून या ठिकाणी होणारी मदतही बंद झाली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या स्थितीत आजी-आजोबा सध्या कोणाच्या भेटीगाठी होत नसल्या तरी ते वृद्धाश्रमात निसर्गरम्य वातावरणात रमले असून एकमेकांसोबत गप्पांचा आनंद लुटत आहे.

काही कारणामुळे कुटुंबापासून दूर असलेले आणि सध्या वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजी-आजोबांचे या कोरोना काळात काय चालले आहे, याविषयी माहिती घेण्यासाठी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी चर्चा केली असता त्यांनी सध्या भेटीगाठी होत नसल्या तरी आम्ही एकमेकांशी चर्चा करून निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत आहे, असे आनंदाने सांगितले.

गेल्या वर्षभरापासून उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीमुळे सर्व क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यामध्ये वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांनादेखील मर्यादा आल्या आहे. वर्षभरापासून भेटीगाठी बंद झाल्या असून या ठिकाणी भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती आणत असलेले जेवणदेखील बंद आहे. मात्र सध्या वृद्धाश्रमात असलेल्या स्वयंपाक घरातूनच वेगवेगळे प्रकारचे मेनू करून आजी-आजोबांना दिले जात आहे.

मदतही आटली

वृद्धाश्रम असो अथवा निराधार मुलांच्या वसतिगृहात अनेक दाते मदत करीत असतात. मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग उद्भवला व तेव्हापासून वृद्धाश्रम व इतर ठिकाणीदेखील त्याचा परिणाम जाणवत आहे. वृद्धाश्रमात असलेल्या आजी-आजोबांना काही मदत व्हावी म्हणून अनेकदा ते रोख रक्कम अथवा काही वस्तू देत असत. मात्र वर्षभरापासून ही मदत कमी झाली आहे. असे असले तरी मातोश्री वृद्धाश्रमात असलेल्या सर्व ३६ आजी-आजोबांना चांगल्यातली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले.

भेट देणारे शून्यच

वृद्धाश्रमात असलेल्या या आजी-आजोबांना भेटण्यासाठी पूर्वी दररोज पाच ते दहा जण तरी येत असत. मात्र कोरोना संसर्गामुळे कोणाला भेटू दिले जात नसून आजी-आजोबांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता एका जणाला जर कोणी भेटले तर त्यातून सर्वांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे दक्षता घेतली जात आहे.

वृद्धाश्रमातील एकूण सदस्य ३६

स्त्री २०

पुरुष १६

भेटावे वाटते मात्र काळजीही महत्त्वाची

आम्ही वृद्धाश्रमात असलो तरी आम्हाला भेटण्यासाठी कुटुंबातील सदस्य येत असत. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने त्यांनीही बाहेर पडू नये व आमच्यापैकी कोणाला भेटले तरी संसर्गाची भीती असते. त्यामुळे भेटावे वाटत असले तरी स्वतःची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे, असे येथील एका आजोबांनी सांगितले.

आमच्यामुळे इतरांना त्रास नको

वृद्धाश्रमातील सदस्यांना भेटण्यासाठी सध्या कोणी येत नाही. काळजी म्हणून त्यांना येऊ दिले जात नाही. आम्ही भेटायचे वाटले तरी आम्हीच मनाला आवर घालून आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून भेटणे टाळतो, असे देखील एका आजोबांनी सांगितले.

निसर्गरम्य वातावरणात रमलो

सध्या कोरोना संसर्गामुळे भेटीगाठी होत नसल्या तरी येथील सदस्य आम्ही एकमेकांशी चर्चा करून आनंदी आहोत. त्यासोबतच परिसरातील निसर्गरम्य वातावरण पाहता येथेच आम्ही सर्व सदस्य रमलो असल्याचे एका आजीबाईंनी सांगितले.

Web Title: Help came along with the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.