मदत घेणा:यांनी आयुष्यात इतरांना मदत करावी

By admin | Published: June 25, 2017 01:45 PM2017-06-25T13:45:05+5:302017-06-25T14:39:43+5:30

भरारी फाउंडेशनतर्फे सामाजिक संवेदना जागृती सोहळ्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Help: To help others in life | मदत घेणा:यांनी आयुष्यात इतरांना मदत करावी

मदत घेणा:यांनी आयुष्यात इतरांना मदत करावी

Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.25- ‘देणा:याने देत जावे, घेणा:याने घेत जावे, घेता घेता  देणा:याचे हात व्हावे’ या ओवींना अनुसरून जगात मदत करणारे अनेक आहेत मात्र आपण त्यांच्यार्पयत पोहचले पाहिज़े मिळालेल्या मदतीतून महिला, विद्याथ्र्यानी मदतीचे सार्थक कराव़े स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबियांसह समाजाचे नाव उज्ज्वल केले पाहिज़े या मदतीची परतफेड करत मदत घेणा:यांनी आयुष्यात इतरांना मदत केली पाहिजे, असा सूर भरारी फाउंडेशन आयोजित सामाजिक संवदेना जागृती सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला
गणपती नगर येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये रविवारी भरारी फाउंडेशनतर्फे संवेदना जागृती सोहळ्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त 110 पाल्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आल़े तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त वारस 65 ते 70 निराधार महिलांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आल़े व्यासपीठावर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, केशवस्मृती समुहाचे भरत अमळकर, उद्योजक रजनीकांत कोठारी, जळगाव रोटरी क्लब ऑफ ईस्टचे अध्यक्ष संजय शहा, जळगाव विभागाचे उपअधीक्षक सचिन सांगळे, नंदलाल गादीया, नरेंद्र खंडेलवाल, अॅड़क़ेबी़वर्मा, जितेंद्र कोठारी, विजय लाठी, स्मिता बाफना, सचिन जेठवानी, वासुदेव पारपियानी मान्यवर उपस्थित होत़े प्रास्ताविकात भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी वर्षभरात फाउंडेशनतर्फे राबविल्या जात असलेल विविध उपक्रमांची माहिती दिली़ तसेच संवेदना जागृती सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला़
 

Web Title: Help: To help others in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.