कासोद्यासह १६ गाव पाणी योजनेचा विज पुरवठा केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:01 PM2018-09-05T22:01:07+5:302018-09-05T22:04:27+5:30
येथील १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा सुमारे १७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत झाल्याने विज वितरण कंपनीकडून बंद करण्यात आला.
कासोदा : येथील १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा सुमारे १७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत झाल्याने विज वितरण कंपनीकडून बंद करण्यात आला.
कासोदा परिसरातील गावांना गिरणा नदीवरील दहिगांव बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात दहिगांव येथील विज पंप व अंतूर्ली गावाजवळील एक पंप अशी दोन्ही ठिकाणची विज बिले या ग्रामपंचायतींनी न भरल्याने ४ रोजी स.११ वाजेनंतर बंद करण्यात आला आहे. ही योजना सुरळीत चालावी, जनतेला पाण्यासाठी पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदने शिखर समिती स्थापन केली आहे. पण दर महिन्याला हिच अडचण ‘आ’ वासून उभी असते. या योजनेवर अवलंबून कासोदा, आडगांव, तळई, वनकोठा, बांभोरी वगैरे सुमारे एक लाख लोकांना पाण्यासाठी वणवण भटकायची वेळ आली आहे.
परीसरात पाऊसच न आल्याने उद्भभवलेली दुष्काळी परिस्थिती, यामुळे कर वसूलीला मोठी अडचण येत आहे. त्यामुळे विज बिलं भरणे कठीण झाले आहे. तरी देखील येत्या दोन तीन दिवसात ही बिलं भरून पाणी पुरवठा सुरळीत करू.
-मनिषा चौधरी
अध्यक्षा,शिखर समिती.