फटाके, कपडे न घेता चाळीसगावातील विद्यार्थीनी केली रुग्णांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:02 PM2017-10-21T13:02:32+5:302017-10-21T13:05:16+5:30
रुग्णांशी साधला संवाद
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 21 - एरवी दिवाळी म्हटली की, शालेय विद्याथ्र्यांना फटाके, कपडय़ांचे मोठे अप्रुप असते. चाळीसगावच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलचे विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी दिवाळीत नवीन कपडे न घेता आणि प्रदुषणमुक्त दिवाळीही फटाके न फोडता चक्क रुग्णांसोबत साजरी केली. साईकृष्णा व कृष्णा क्रीटीकल केअर हॉस्पिटलमध्ये जाऊन शुक्रवारी विद्याथ्र्यांनी दहा हजाराची मदत केली.
मुख्याध्यापिका सिस्टर लिजी, उपमुख्याध्यापिका सिस्टर दिव्या यांनी विद्याथ्र्यांना डोळस अनुभव यावा म्हणुन या उपक्रमाचे आयोजन केले. याला शाळेतील काही विद्याथ्र्यांनी प्रतिसाद दिला.
डॉ. सुनील राजपूत, डॉ. पल्लवी वाडेकर, डॉ. चंदा राजपूत, यांच्या मदतीने पाय फॅर असलेल्या 17 वर्षीय शशिकांत विजय चौधरी, साथीच्या आजाराने त्रस्त मायाबाई वाघ व तिचे अकरा महिन्याचे बाळ यांना प्रत्येकी पाच हजाराची मदत केली. रुग्णांशी विद्याथ्र्यांनी छान गप्पाही मारल्या. या दोन्ही रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची आहे. विद्याथ्र्यांनी केलेली मदत पाहुन रुग्णांना गहिवरुन आले. यावेळी रश्मी पाटील, पुनम वाघमारे, नंदकिशोर महाजन, विजय चौधरी आदी उपस्थित होते.