पाळधी येथील आगग्रस्त शेतमजुराला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:25 PM2019-07-17T18:25:30+5:302019-07-17T18:29:22+5:30
पंचायत समिती सभापती नीता कमलाकर पाटील व इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीचे सदस्य कमलाकर पाटील यांच्यातर्फे ‘एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आगग्रस्त शेतमजूर कुटुंब जयसिंग भिल यांना मदत करण्यात आली.
पाळधी ता.जामनेर, जि.जळगाव : पंचायत समिती सभापती नीता कमलाकर पाटील व इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीचे सदस्य कमलाकर पाटील यांच्यातर्फे ‘एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आगग्रस्त शेतमजूर कुटुंब जयसिंग भिल यांना मदत करण्यात आली.
आगीमुळे त्यांचा संसार उघड्यावर आला होता. या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर या आगग्रस्त भिल परिवारास अनेकांकडून मदत मिळत आहे.
सभापती नीता पाटील यांच्याकडून ५० किलो गहू, तेवढाच तांदूळ, तेल व साखर पाच किलो, लहान मुलांसाठी १० ड्रेस, ताडपत्री आदी संसारोपयोगी वस्तू तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीकडून भांड्यांचे तीन सेट, दोन चटई आदी वस्तू मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
शिवसन्मान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांच्याकडून या कुटुंबीयांना कपडे तसेच परिवारातील सर्व सदस्यांना एक वर्षभर मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार आहे. तसेच ईश्वर परदेशी यांनी कपडे व साडी दिली.
साहित्य वाटपप्रसंगी सरपंच सोपान सोनवणे, माजी सरपंच कमलाकर पाटील, माजी सरपंच डिगंबर माळी, ग्रा. पं. सदस्य जीवन पाटील, मस्तान तडवी, सीताराम कोळी, नाना सुशीर, देवचंद परदेशी, मनोज जंजाळ, किरण पाटील, योगेश पाटील, पिंटू भिल, सुनील गायकवाड, विनोद ढोले, राजेंद्र पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.