कोपरगावच्या शहिदांच्या कुटुंबियांना जळगावातून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:13 PM2019-11-13T12:13:06+5:302019-11-13T12:13:20+5:30

जळगाव : जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहिद झालेले कोपरगाव येथील रहिवासी नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या ...

A helping hand to the families of the martyrs of Kopargaon | कोपरगावच्या शहिदांच्या कुटुंबियांना जळगावातून मदतीचा हात

कोपरगावच्या शहिदांच्या कुटुंबियांना जळगावातून मदतीचा हात

Next

जळगाव : जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहिद झालेले कोपरगाव येथील रहिवासी नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या कुुटुंबीयांना जळगावातून आर्या फाउंडेशनतर्फे ६५ हजार रुपयांची मदत करीत आधार देण्यात आला.
देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फाउंडेशन ही संस्था पुढे सरसावली असून शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करीत आहे. फाउंडेशनतर्फे आतापर्यंत राज्यातील ठिकठिकाणच्या १५ शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
यात आता कोपरगावातील शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत कोपरगावचे नायब सुभेदार सुनील वलटे हे शहीद झालेत. फाउंडेशनतर्फे वीरपत्नी मंगल वलटे यांच्या नावे ६५ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या घरी जाऊन फाउंडेशनचे प्रतिनिधी रवींद्र पाटील, रोशन शाह यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सुपुर्त केला. या वेळी कोपरगावचे अजय बाबुराव पहेलवान, शहीद नायब सुनील वलटे यांचे वडील रावसाहेब वलटे, आई सुशीला वलटे, पत्नी मंगल वलटे उपस्थित होते. फाउंजेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी शहिदांच्या कुटुंबियांशी संपर्क साधत सांत्वन केले.
सरपंच मदतीसाठी पुढे
शहीद वलटे यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी पक्के घर नसल्याचे लक्षात आल्यावर डॉ. पाटील यांनी दहेगाव बोलका येथील सरपंच साधना देशमुख यांना मदत करण्याची विनंती केली. त्यावर पक्क्या घरासाठी मदत करू असे आश्वासन सरपंचांनी दिले.
स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपऱ्यात मदतीसाठी पोहचतात पदाधिकारी
राज्यात आतापर्यंत नाशिक, अमरावती, यवतमाळ, अकोला, सातारा, सांगली, नंदुरबार, शिंदखेडा, मुंबई, धुळे पुणे, मलकापूर, बुलढाणा इत्यादी ठिकाणच्या शहीद कुटुंबियांच्या घरी आर्या फाउंडेशनचे पदाधिकारी हे स्वखर्चाने मदतीसाठी पोहचतात, हे विशेष.
देशासाठी प्राणाचे बलिदान देणाºया शहिद जवानांच्या कुटुंबियांना आधार मिळावा व सीमेवरील जवानांचा हुरूप वाढावा या उद्देशाने आपण ही मदत करीत असतो, असे आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले.
या शहीद जवानांच्या कुटुंबियांना केली मदत
संदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, ता.जि. नाशिक), विकास कुळमेथ े(नेरळ, ता.वणी, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर, ता.जि. अमरावती), चंद्रकांत गलांडे (जाशी, ता.माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव, ता.मिरज, जि. सांगली), सुमेध वामन गवई (लोणाग्रा,ता.जि.अकोला), रवीद्र धनावडे (मोहट मेळा, ता.जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार, (नंदुरबार, रा.म्हसरूळ, नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाने, ता.शिंदखेडा, जि. धुळे), कौस्तुभ प्रकाश राणे (मिरा रोड मुंबई), केशव गोसावी (सिन्नर, नाशिक), मेजर शशीधरन नायर, (खडकवासला, पुणे) संजय राजपूत (मलकापूर), नितीन राठोड (चोरपांगरा, लोणार,जि. बुलढाणा)
 

Web Title: A helping hand to the families of the martyrs of Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव