शैक्षणिक उपक्रमातून देणार मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:52+5:302021-07-19T04:12:52+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून सर्वसाधारण बैठक होऊ न शकलेल्या डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनची बैठक १७ रोजी ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून सर्वसाधारण बैठक होऊ न शकलेल्या डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनची बैठक १७ रोजी झाली. यामध्ये शैक्षणिक उपक्रम राबवून गरजूंना मदत केली जाणार असल्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याने संघटनेची वार्षिक बैठक केमिस्ट भवन येथे झाली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर, कनकमल राका, संदीप बेदमुथा, ब्रिजेश जैन, दिनेश मालू, संजय नारखेडे यांच्यासह तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटात केमिस्ट बांधवांनी सलग सेवा दिल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासह केमिस्ट अजून सक्षम व्हावा, यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच कोरोनाच्या संकटाने अनेकांची स्थिती बिकट झाली असून गरजूंना शैक्षणिक उपक्रमातून मदत केली जाईल, अशी माहिती सुनील भंगाळे यांनी दिली. या सोबतच प्रत्येक तालुक्यात संघटन मजबुतीवर भर दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.