कोकण पूरग्रस्तांसाठी जळगावाहूनही धावले मदतीचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:11+5:302021-07-29T04:18:11+5:30
शहरातील सेवारथ परिवार, सुमतीलाल टाटिया, जैन श्र्वेतांबर मूर्तिपूजक संघ, जैन महिला मंडळ, सिंधी समाज, रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन, ...
शहरातील सेवारथ परिवार, सुमतीलाल टाटिया, जैन श्र्वेतांबर मूर्तिपूजक संघ, जैन महिला मंडळ, सिंधी समाज, रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन, चटई असोसिएशन, लघुउद्योग भारती, सेवा धर्म परिवार यांच्यासह रत्ना जैन, विजय रेवतानी, कस्तुरी चांद बाफना या दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केली. यात जमा झालेल्या साडेसात लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. यामध्ये साड्या, शर्ट-पँट, टिकाव, फावडे, रिकामे डबे, तेल,चहा, साखर, हळद, आटा, चटई, पाणी शुद्ध करण्याचे ड्रॉप, लहान मुलांचे कपडे, चपला, औषधी ,प्लॅस्टिक कागद, बिस्कीट आदी प्रकारच्या वस्तू पाठविण्यात आल्या. प्रशासनाच्या मदतीसाठी सेवारत परिवारासह ५० कार्यकर्ते हे मदत वाटपासाठी कोकणाकडे रवाना झाले आहेत.
इन्फो :
जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक :
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामजिक संस्थांनी केवळ दोन दिवसांत साडेसात लाख रुपयांची मदत उभी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व सामजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे कौतुक करून आभार मानले. यावेळी त्यांच्या हस्ते ही मदत उभारण्यासाठी मदत करणाऱ्यांचा सुमतीलाल तातिया व इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवारत परिवाराचे डॉ. रितेश पाटील, दिलीप गांधी, प्रकाश सेठिया, महेंद्र रायसोनी, राजू अडवाणी,डॉ. वडजीकर, किरण गांधी, अनिता कांकरिया, चंद्रशेखर नेवे, समीर साने, सुश्मिता भालेराव, सविता बोरसे, आरती व्यास, मनीषा पाटील, आदित्य पागरिया, दिनेश ठक्कर उपस्थित होते.