म्युकरमायकोसिस आजाराने मयताच्या कुटुंबास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:50+5:302021-06-17T04:12:50+5:30
पहूर पेठमधील रहिवासी राहुल उर्फ छोटू पाटील यांच्यावर कोरोनासह म्युकरमायकोसिस झाल्याने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. ...
पहूर पेठमधील रहिवासी राहुल उर्फ छोटू पाटील यांच्यावर कोरोनासह म्युकरमायकोसिस झाल्याने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खासगी पेट्रोलपंपावर मजुरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी राहुल पार पाडत होता. गेल्यावर्षी राहुलचे पितृछत्र हरपले. त्यांचा पश्चात आई, पत्नी, चिमुकला शशांक असा परिवार आहे. शशांकची शैक्षणिक जबाबदारी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांनी पुढाकार घेऊन यांच्या माध्यमातून यांच्या शैक्षणिक संस्था महावीर पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाने घेतल्याचे पत्र दिले आहे. तसेच राहुलच्या उपचारासाठी माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी एक लाखापर्यंत आर्थिक मदत केली आहे. या परिवारासमोर जीवन जगण्याचा प्रश्न उभा झाला असून, उदरनिर्वाह करण्यासाठी चिंता भेडसावत आहे.
कँप्शन राहुल पाटील