केरळ पूरग्रस्ताना विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:56 PM2018-08-25T22:56:38+5:302018-08-25T22:57:07+5:30

सात तासात जमविली १५ हजारांची रक्कम

Helping students of Kerala flood surge | केरळ पूरग्रस्ताना विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

केरळ पूरग्रस्ताना विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

Next

चोपडा, जि.जळगाव : केरळ येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात प्रचंड वित्तहानी व नुकसान झाले आहे. शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील सेवाभावी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मदत निधी संकलनाचे काम केले आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (कनिष्ठ व वरीष्ठ), शिक्षण शास्त्र विद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथील परिसरात फिरून विद्यार्थ्यांकडून व शहरातील नारायणवाडी, मेन रोड या भागात फिरून निधी संकलन करण्यात आले.
या निधी फेरीला सर्वसामान्य, मान्यवर, विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांसह विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने मदत केली. त्यात या विद्यार्थ्यांनी सात तासांत पंधरा हजारांची रक्कम जमा केली आहे.
प्रा.प्रदीप पाटील, प्रा.संदीप भास्कर पाटील यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन प्रतिनिधी अनिल बाविस्कर, लोकेश लाटे, मंगेश पाटील, दिव्यांक सावंत, चेतन बाविस्कर, अक्षय पाटील, भुवनेश्वरी पाटील, सनी पाटील, अक्षय वैद्य, समाधान सोनवणे, नरेंद्र मैराळे, कामिल तडवी, विश्वनाथ चौधरी, तन्वीर पिंजारी, दिनेश पाटील, सिकंदर तडवी, लीलाधर बाविस्कर, परेश पवार, छाया काविरे, उर्वेश साळुंखे, शुभम तडवी, तुषार साळुंखे यांनी निधी संकलनाचे काम केले.
नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले आहे. दरम्यान, सर्व निधी संकलन झाल्यानंतर केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी पाठविला जाणार आहे.

Web Title: Helping students of Kerala flood surge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.