शिवसेनेतर्फे रिक्षाचालक बांधवांसाठी मदत कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:22+5:302021-05-25T04:18:22+5:30

जळगाव : शिवसेना जळगाव महानगरतर्फे शहरातील पांडे चौक येथे रिक्षाचालक बांधवांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी कक्षाचे ...

Helpline for rickshaw pullers from Shiv Sena | शिवसेनेतर्फे रिक्षाचालक बांधवांसाठी मदत कक्ष

शिवसेनेतर्फे रिक्षाचालक बांधवांसाठी मदत कक्ष

Next

जळगाव : शिवसेना जळगाव महानगरतर्फे शहरातील पांडे चौक येथे रिक्षाचालक बांधवांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी कक्षाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते होणार आहे.

२५ मे ते ५ जूनपर्यंत शहरातील परमिटधारक रिक्षाचालक बांधवांना ऑनलाइन अर्ज याठिकाणी भरून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील ७ लाख १५ हजार परमीटधारक रिक्षाचालक बांधवांना कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून १ हजार ५०० रुपये घोषित करण्यात आले होते. सदर दीड हजार रुपये परमिटधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात येणार असून, यासाठी त्यांना ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. यासाठी आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स, बॅच, रिक्षा परवाना इत्यादी कागदपत्र लागणार आहेत. तरी जास्तीत जास्त रिक्षाचालक बांधवांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसैनिक व युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे.

Web Title: Helpline for rickshaw pullers from Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.