शिरसोली येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:53 IST2018-08-28T18:52:10+5:302018-08-28T18:53:38+5:30
शिरसोली प्र.न.येथील सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती विलास भास्कर माळी याला अटक करण्यात आली आहे. पतीसह सासरा भास्कर पुना माळी या दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोली येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पतीला अटक
जळगाव : शिरसोली प्र.न.येथील सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती विलास भास्कर माळी याला अटक करण्यात आली आहे. पतीसह सासरा भास्कर पुना माळी या दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली हिने सोमवारी सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर पती व सासºयाविरुध्द कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे सोमवारी मृतदेह जिल्हा रुग्णालयातच होता. मंगळवारी सोनाली हिची आई खटाबाई देविदास महाजन (वय ६०, रा.आडगाव, ता.चोपडा) यांनी फिर्याद दिल्याने सोनालीचा पती विलास व सासरे भास्कर माळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात सोनालीचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सोनालीवर शिरसोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, विलास याला अटक करण्यात आली आहे.